देशभरात गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात जाळपोळ अन् हिंसाचार केला जात आहे, जिहादी षड्यंत्र राबवले जात आहे. याचे कारण काय, तर पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अन्य देशांतील मुसलमानांना भारताचे नागरिकत्व मिळणार नाही ! पण याचा भारतातील मुसलमानांना राग का ? काश्मिरी हिंदूंना भारतातच निर्वासित व्हावे लागले आणि 29 वर्षांनीही अद्याप त्यांच्या भूमीत त्यांना परत जाता आलेले नाही, याबद्दल ‘ब्र’ही न काढणारे अभारतीय (विदेशी अवैध घुसखोर) मुसलमानांसाठी भारतात जाळपोळ का करत आहेत ? जगभरातील मुसलमानांना आश्रय देण्यासाठी 56 इस्लामी देश आहेत, पण हिंदूंना (हिंदू, शीख, जैन, पारसी आदींना) आश्रय देण्यासाठी एकही हिंदूंचा देश नाही ! त्यामुळे स्वाभाविकपणे हिंदूंना सामावून घेणे, हे भारताचे कर्तव्यच आहे. त्यामुळे ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ आणून भारत सरकारने अत्यंत योग्य आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याकरिता देशभक्त-हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नागरिक यांनी CAA चे समर्थन करून सरकारच्या पाठीशी आणि हिंसाचार करणार्यांच्या विरोधात उभे रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे. हिंदु जनजागृती समिती देशभरात CAA च्या समर्थनार्थ आंदोलन करणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी कळवले आहे.
निर्वासित हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती आग्रही होती. वर्ष 2012 पासून ‘अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशना’च्या माध्यमातून हा मुद्दा समितीने लावून धरला होता. आता ही मागणी पूर्ण झाली आहे आणि घुसखोरांना बाहेर हाकलण्याची वेळ आली आहे. देशभरात चाललेल्या हिंसाचारामागे कोणाचे षड्यंत्र आहे का, याचाही तपास करण्याची आवश्यकता असून ज्या समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली, जाळपोळ केली, सार्वजनिक संपत्तीची हानी केली, त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणीही श्री. शिंदे यांनी या वेळी केली.
हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’च्या समर्थनार्थ आणि हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन
-
स्तुत्य निर्णयासाठी केंद्र सरकारचे अभिनंदन
-
हिंसक कारवाया करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी
केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान यांसह अन्य देशातून भारतात आलेल्या हिंदु, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देणारे ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ संमत केले आहे. सरकारने लोकशाही मार्गाने आणि राज्यघटनेच्या अधिकारात अत्यंत स्तुत्य असा निर्णय घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे समर्थन करण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन करण्यासाठी, तसेच या निर्णयाच्या विरोधात हिंसक आंदोलन करून राष्ट्रीय संपत्तीची हानी करणार्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी अनेक ठिकाणी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच राष्ट्र अन् धर्मप्रेमी नागरिक यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
निवेदन बघण्यासाठी येथे क्लिक करा
गोवा
म्हापसा : हिंदु जनजागृती समितीने नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी म्हापसा येथील नगरपालिका बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सभेचे आयोजन केले होते. सभेत ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ आणि ‘राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी’ यांच्या समर्थनार्थ उपस्थितांनी घोषणा दिल्या. या वेळी उपस्थितांनी सभेला संबोधित केले आणि यातून पुढील सूर उमटला. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे देशभरातील काही धर्मांध आणि साम्यवादी (कम्युनिस्ट) संघटना, तसेच देशविघातक कारवाया करणारे यांना रुचलेला नाही. त्यामुळेच त्यांनी देहली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल येथे हिंसक आंदोलने चालू केली आहेत. यामध्ये सार्वजनिक संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी केली जात आहे आणि पोलिसांवरही आक्रमण केले जात आहे. समाजद्रोही आंदोलकांकडून करण्यात येणारे हिंसक आंदोलन आणि त्यातून होत असलेली हानी निषेधार्ह आहे. या सभेत ‘स्वराज्य संघटने’चे श्री. प्रशांत वाळके, श्री. जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शुभा सावंत यांनी विचार मांडले. सभेचे सूत्रसंचालन श्री. गोविंद चोडणकर यांनी केले.
राजापूर, दापोली आणि लांजा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
रत्नागिरी : हिंसक आंदोलने करून देशाची शांतता आणि अखंडता भंग करणार्या समाजकंटकांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच विश्वविद्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यासाठी लागणारे दगड आणि जाळपोळ करण्यासाठी लागणारे इंधन कुठून आले ?, या षड्यंत्रामागे कोण आहे ?, याची सखोल चौकशी करून दोषी आढळणार्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, देहली विश्वविद्यालय आदी विद्यापिठांतील ज्या विद्यार्थ्यांनी या हिंसाचारात सहभाग घेतला, त्यांना तात्काळ विद्यापिठातून काढून टाकावे, अलीगड मुस्लिम विद्यापिठात हिंदुत्वाच्या विरोधात विषारी घोषणा देऊन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, आदी मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजापूर, दापोली आणि लांजा येथे केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवण्यासाठी तहसीलदारांना देण्यात आले.
कुडाळ (सिंधुदुर्ग )
कुडाळ – १९ डिसेंबरला आंदोलना नंतर या मागण्यांचे केंद्रीय गृहमंत्री यांना द्यायचे निवेदन येथील नायब तहसीलदार श्रीमती दर्शना चव्हाण यांना देण्यात आले. सद़्गुरु सत्यवान कदम यांच्या वंदनीय उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांना देण्यात आलेल्या.
क्षणचित्र : आंदोलनाच्या ठिकाणी विशेष शाखेचे साध्या वेशातील एक पोलीस कर्मचारी आंदोलन संपेपर्यंत उपस्थित होते. त्यांनी
आंदोलनाचे चित्रीकरण केले, तसेच छायाचित्रे काढली. समितीचे कार्यकर्ते तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी गेले असता, त्यांच्यासह तहसीलदारांच्या दालनात आले अन् निवेदन देतांनाचे छायाचित्र काढले. (सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्यांवर लक्ष ठेवणार्या पोलीस यंत्रणेने आतापर्यंत देशविरोधी कारवाया करणार्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई केली असती, तर नागरिकत्व सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर देशात राष्ट्रीय संपत्तीची हानी करणारी हिंसक आंदोलने झाली नसती. – संपादक) दोडामार्ग येथे आज कायद्याच्या समर्थनार्थ फेरी
मालवण (सिंधुदुर्ग )
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी नागरिक यांच्या वतीने शहरातील मेकॅनिकल रोड, स्वामी हॉटेलजवळ, बुधवार पेठ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्यानंतर या मागण्यांचे केंद्रीय गृहमंत्री यांना द्यायचे निवेदन येथील तहसीलदार अजय पाटणे आणि उपजिल्हाधिकारी श्रीमती रोहिणी रजपूत यांना देण्यात आले. सद़्गुरु सत्यवान कदम यांच्या वंदनीय उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी गणेश कुशे (नगरसेवक, भाजप), परशुराम उपाख्य आप्पा लुडबे (नगरसेवक, भाजप), श्री. विलास हडकर (प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप), सौ. वैदेही जुवाटकर (धर्माभिमानी), सौ. शिल्पा यतीन खोत (स्वराज्य महिला ढोलपथक मालवण); दादा वाघ, तालुकाध्यक्ष नगरपरिषद आघाडी भाजप; धर्माभिमानी सर्वश्री राजेश वळंजू, अरविंद ओटवणेकर, शिवाजी देसाई, दशरथ कवठकर, संजय गोवेकर, देऊ करलकर, बबन परुळेकर, श्रीमती नीलम शिंदे, सौ. स्नेहलता भोजने, सौ. प्रतिभा चव्हाण, सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आदी राष्ट्रप्रेमी
कोल्हापूर
देशाची अखंडता आणि शांतता भंग करणार्या समाजकंटकांवर कारवाई करा ! – मनोज खाडये
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधाचे प्रकरण
कोल्हापूर : केंद्र सरकारने ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ संमत केले. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे देशभरातील काही धर्मांध आणि कम्युनिस्ट संघटना, तसेच देशविघातक कारवाया करणार्यांना रूचलेला नाही. त्यामुळेच त्यांनी देहली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल येथे हिंसक आंदोलने चालू केली आहेत. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी करत आहेत आणि पोलिसांवरही आक्रमण करत आहेत. समाजद्रोही आंदोलकांकडून करण्यात येणारे हिंसक आंदोलन आणि त्यातून होणारी हानी निषेधार्ह आहे. तरी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणार्या समाजकंटकांवर कारवाई करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले.
१९ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.