Menu Close

धुळे येथील सभेत भाजप आमदार टी. राजासिंह यांच्यावर हल्ल्याचे षडयंत्र ?

धारदार शस्त्रासह मुसलमान युवक ताब्यात !

काल २२ डिसेंबर रोजी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धुळे येथे घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत संशयास्पद हालचाली करणारा एक मुस्लिम युवक कार्यकर्त्यांना आढळून आला. या युवकाची झडती घेतली असता, त्याच्याकडे धारदार कटर असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला त्वरित सभास्थळी उपस्थित असणार्‍या पोलीस अधिकार्‍यांंच्या ताब्यात देण्यात आले. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या युवकाने धारदार शस्त्रासह प्रवेश करणे संशयास्पद आहे. सभेतील प्रमुख वक्ता असलेले हैदराबाद येथील भाजप आमदार टी. राजासिंह यांना सातत्याने ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून, त्या दृष्टीने तर हा मुस्लिम युवक सभास्थळी शिरला नव्हता ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या संदर्भात पूर्ण तपास करून सदर युवकावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.

पोलिसांचे ‘मेटल डिटेक्टर’ शोभेसाठी ?

सभेच्या प्रवेशद्वारावर हिंदू असल्याचे दर्शवून हा शस्त्रधारी मुस्लिम युवक सभास्थळी घुसला; मात्र आत घुसल्यावर त्वरित टिळा पुसून तो व्यासपिठाच्या दिशेने निघाला. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याच्या लक्षात येताच समितीच्या कार्यकर्त्यांनी त्याला हटकले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात धारधार कटर आढळला. प्रारंभी स्वत:ची ओळख सांगण्यास टाळणार्‍या या युवकाला पोलिसांकडे स्वाधीन केल्यावर त्याने स्वत:चे नाव ‘बाबू शेख’ असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे प्रवेशद्वारावर ‘मेटल डिटेक्टर’ लावला असतांना, तसेच पोलीस हातातील ‘मेटल डिटेक्टर’ ने येणार्‍या प्रत्येकाची झडती घेत असतांना शस्त्र घेऊन हा युवक प्रवेशद्वारातून आत शिरलाच कसा, याविषयी आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यातून सध्या सगळीकडे तणावाचे वातावरण असतांनाही शांत असणार्‍या धुळे शहरात अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा काही धर्मांधांचा प्रयत्न असल्याचे लक्षात येते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *