नाशिक – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे तीन दिवसीय ‘युवा साधना शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा धुळे, जळगाव, संभाजीनगर, नाशिक शहरासह निफाड आणि कोपरगाव (जिल्हा नगर) येथील युवक-युवतींनी लाभ घेतला. शिबिराच्या आरंभी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी ओळख करून देण्यात आली.
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी शिबिरार्थींना ‘मानवी जीवनातील साधनेचे महत्त्व’, ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून आनंदी कसे व्हायचे ?’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’ यांसारख्या विविध विषयांवर अनमोल मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ आणि ‘स्वरक्षण कसे करावे ?’ यांसंदर्भात माहिती देण्यात आली.