प्रतिकूल परिस्थितीला वैध मार्गाने सामोरे जात धर्मकार्य चालूच ठेवण्याची धर्मप्रेमींनी दर्शवली सिद्धता !
कोची (केरळ) : अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी कार्य करणार्या आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हायची सिद्धता दर्शवलेल्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच कोची येथे झाली. गोवा येथे झालेल्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’तून प्रेरणा घेऊन एका हिंदुत्वनिष्ठांच्या पुढाकाराने केरळमधील ७ जिल्ह्यांमधील एकूण ५० हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हिंदु राष्ट्राशी संबंधित शंकानिरसन, तसेच ‘साधनेचे महत्त्व आणि साधना कशी करावी ?’या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. नंदकुमार कैमल, श्री. बालकृष्णन् आणि कु. रश्मी परमेश्वरन् यांनी मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. धर्मकार्य करतांना हिंदुत्वनिष्ठांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागते. तरीही धर्मासाठी या परिस्थितीला वैध मार्गाने सामोरे जाण्याची सिद्धता या हिंदुत्वनिष्ठांनी दर्शवली.
२. ‘बैठकीत ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर चर्चा करतांना उपस्थितांना चैतन्य आणि ऊर्जा मिळत होती’, असे जाणवले.
३. आपापल्या जिल्ह्यांत गेल्यानंतर तेथे धर्मप्रसार, तसेच धर्मसत्संग आयोजित करण्याची सिद्धता अनेकांनी दर्शवली.