Menu Close

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाणे येथे हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन

स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणार्‍या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करा ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, हिंदु जनजागृती समिती

‘आम्ही सारे सावरकर’ अशा घोषणा देतांना हिंदुत्वनिष्ठ

ठाणे : भोपाळ येथे काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर-कितने वीर’ ?’ या नावाने वाटण्यात आलेल्या पुस्तकातून काँग्रेसवाले स्वातंत्र्यवीरांची अपकीर्ती करण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हेच दिसून येते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाच नव्हे, तर कोणताही राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान कोणाकडूनही होऊ नये’, यासाठी केंद्र सरकारने तात्काळ या संदर्भात कायदा करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचा सावरकरद्वेष हा संपूर्ण क्रांतीकारी चळवळीविषयीचाच द्वेष असून या आक्षेपार्ह पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी, तसेच त्याचे लेखक अन् प्रकाशक यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केली. त्या १० जानेवारी या दिवशी ठाणे पश्‍चिम रेल्वेस्थानकाच्या बाहेर सॅटिस पुलाखाली करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात बोलत होत्या.

‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिलेले फलक परिधान करून राष्ट्रप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’, ‘क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करा’ अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात रा.स्व. संघ, हिंदूराष्ट्र सेना, वंदे मातरम् प्रतिष्ठान, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि विविध संघटनांतील सावरकरप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात दादर येथे हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले ! – वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

मुंबई : जन्मठेपेची शिक्षा भोगतांना अन्य भारतीय राजकीय बंदीवानांच्या सुटकेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रयत्न केले होते. काँग्रेसने त्याचा दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले. आता भोपाळ येथील काँग्रेस सेवा दलाच्या शिबिरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी हीन दुष्प्रचार करणारी पुस्तके वाटण्यात आली. त्यामुळे जनतेत काँग्रेसविषयी संताप आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी केले. ९ जानेवारी या दिवशी दादर (पश्‍चिम) रेल्वेस्थानकाच्या बाहेर विविध हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या निषेधार्थ राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी वैद्य धुरी बोलत होते.

‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिलेले फलक हातात धरून राष्ट्रप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम्’ अशा घोषणा देत क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनात सावरकर स्मारक, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, वज्रदल, श्रीराम गणेश मंदिर मित्र मंडळ, न्यू परशुराम क्रीडा मंडळ (काळाचौकी), रायगड संवर्धन प्रतिष्ठान आणि हिंदु जनजागृती समिती आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी, सनातन संस्थेचे साधक अन् अनेक सावरकरप्रेमी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ वणी (यवतमाळ) येथे शासनाला निवेदन

वणी (यवतमाळ) : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे काँग्रेसच्या सेवादलाच्या शिबिरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक मजकूर असलेली पुस्तके वाटण्यात आली. या पुस्तकावर बंदी घालण्याची आणि पुस्तकाच्या लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या विषयाचे निवेदन उपविभागीय कार्यालयातील तहसीलदार देवेंद्र चपरिया यांच्या वतीने गृहमंत्र्यांना देण्यात आले.

वीर सावरकरांचा अवमान केल्याच्या विरोधात धुळे आणि जळगाव येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

भोपाळ येथे नुकतेच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात ‘वीर सावरकर-कितने ‘वीर’ ?’ या नावाने एक पुस्तक वाटण्यात आले. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती करण्यात आली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू असावा, अशी शंका येते. यासाठी या पुस्तकावर बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी धुळे अन् जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि यावल येथे प्रशासनाला दिले आहे.

धुळे

धुळे येथे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

येथील उपजिल्हाधिकारी उमेश महाजन यांना निवेदन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जोरदार घोषणा देत निदर्शनही करण्यात आले. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. मनोज जैन, डॉ. सचिन चिंगरे, श्री. विनोद सोमाणी, श्री. मयूर कुलकर्णी, श्री. विनोद सोमाणी, हिंदु एकता आंदोलन पक्षाचे श्री. मनोज घोडके, बजरंग दलाचे श्री. गुलाब माळी, श्री. शुभम चौधरी, श्री. हरीश चौधरी, श्रीराम उत्सव समितीचे श्री. योगेश भोकरे, राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. प्रकाश माधवाणी, स्वदेशी जागरण मंचचे श्री. विलास राजपूत, सिद्धिविनायक मंदिराचे श्री. मनोहर शर्मा, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महेश निकम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. पंकज धात्रक, हिंदुत्वनिष्ठ श्री. राजेंद्र मराठे (राजू महाराज), सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. विश्‍व हिंदु परिषद, हिंदु एकता आंदोलन पक्ष, बजरंग दल, श्रीराम उत्सव समिती यांच्या वतीनेही उपजिल्हाधिकार्‍यांना स्वतंत्र निवेदन देण्यात आले.

चोपडा (जळगाव)

चोपडा येथे १. तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ८ जानेवारी या दिवशी तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री विकास चौधरी, जनार्दन शिंदे, मनीष नेवे, राजेंद्र वराडे, केशव ताडे, सागर मराठे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

यावल (जळगाव)

यावल येथे निवेदन स्वीकारतांना तहसीलदार श्री. जितेंद्र कुंवर (डावीकडे)

येथे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सावरकरप्रेमी नागरिक यांनी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, महाकाल ग्रुपचे श्री. राहुल कोळी, सावरकरप्रेमी सर्वश्री महेश नन्नवरे, हितेश देशमुखे, सोहन नारेकर, वासुदेव गैची उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *