श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची ‘धारातीर्थ गडकोट मोहीम’
धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडियले…
सातारा : भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र असूनही हिंदुबहुल भारतात हिंदूंना त्यांच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. पोप जॉन पॉल यांनी २ दशकांपूर्वी भारतात येऊन भारत हा ख्रिस्तीमय करण्याची घोषणा केली होती. अनेक जिहादी संघटनाही भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचे स्वप्न पाहतात. त्याचाच एक भाग म्हणून भारतात मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मांधांकडून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. हे धर्मांतर करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो. त्या व्यतिरिक्त कॉन्व्हेंट शाळा, हिंदुविरोधी संघटना यांच्याकडूनही हिंदूंचा बुद्धीभेद केला जाऊन त्यांना हिंदुत्वापासून तोडले जाते. बॉलीवूडच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जाते. हिंदु धर्मावरची निष्ठा अल्प पडत असल्याने हिंदू धर्मांतरांच्या प्रयत्नांना बळी पडून हिंदु धर्म सोडतात. ‘हिंदु राष्ट्राची निर्मिती’ हेच या हिंदु धर्मावरील सर्व समस्यांचे उत्तर आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. जिल्ह्यातील मधुमकरंदगडावर ८ जानेवारी या दिवशी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने होत असलेल्या गडकोट मोहिमेचा आरंभ झाला. त्या वेळी ‘धर्मांतर’ या हिंदु धर्मावरील आघाताच्या अनुषंगाने ते बोलत होते. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांच्यासह सहस्रो धारकरी उपस्थित होते.
श्री. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते हलगी पथकाच्या गजरात ध्वजपूजन करून मोहिमेला प्रारंभ झाला.
श्री. सुनील घनवट यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. २-३ शतकांपूर्वी भारत हे एक विराट राष्ट्र होते. वर्ष १८७६ मध्ये अफगाणिस्तान, १९०४ मध्ये नेपाळ, १९०६ मध्ये भूतान, १९१४ मध्ये तिबेट, १९३७ मध्ये म्यानमार, १९३९ मध्ये श्रीलंका ही राष्ट्रे भारतापासून विलग झाली. वर्ष १९४७ मध्ये धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली.
२. भारतापासून विलग झालेली अनेक राष्ट्रे मुसलमान राष्ट्रे झाली; पण भारत धर्मनिरपेक्ष राहिला. धर्मनिरपेक्ष भारतात हिंदूंवर अन्याय होत आहे.
३. ईशान्येकडील राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत, तर वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यात आले. आज हिंदूंच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.
४. धर्मांधांकडून सध्या लव्ह जिहादच्या जोडीला ‘हलाल सर्टिफिकेशन’च्या माध्यमातून मुसलमान अर्थव्यवस्था निर्माण होत आहे. त्याचा सर्व स्तरांवर विरोध करायला हवा.
५. राष्ट्रपुरुष, हिंदूंची श्रद्धास्थाने यांवर आघात करून हिंदूंच्या धर्मनिष्ठा नष्ट करायच्या असे प्रयत्न हिंदु विरोधकांकडून केले जातात. त्याचाही सर्व स्तरांवर प्रतिकार केला पाहिजे. धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदू पीर, दर्गे यांना जाऊन नवस करतात. वेगवेगळे ‘डे’ साजरे करतात. हे वैचारिक धर्मांतरच आहे.
ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मांधांकडून हिंदूंच्या धर्मांतरासाठी केले जाणारे छळकपटही श्री. सुनील घनवट यांनी या वेळी सोदाहरण सांगितले. ध्येयमंत्राने मोहिमेला प्रारंभ झाला आणि प्रेरणामंत्राने मोहिमेची सांगता झाली.
विशेष : सर्वच धारकर्यांनी भ्रमणभाषचा दिवा (टॉर्च) लावून धर्मांतराच्या विरोधात कृतीच्या स्तरावर एक धर्मप्रचारक होऊन सहभागी होण्यास अनुमोदन दिलेे.
देव, देश अन् धर्म यांचा जागर करणारी अभूतपूर्व गटकोट मोहीम
देव, देश अन् धर्म यांचा जागर करणारी आणि त्या माध्यमातून हिंदूसंघटन साध्य करणारी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची गडकोट मोहीम अभूतपूर्व आहे. ही मोहीम म्हणजे केवळ भ्रमंती नसून त्या माध्यमातून हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाच्या स्मृतींना मिळत असलेला उजाळा आहे. धारकर्यांची शिस्त, आज्ञाधारकपणा, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्याप्रती धारकर्यांची असलेली श्रद्धा आणि समर्पण भाव शिकण्यासारखा आहे. आदर्श नेतृत्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पू. भिडेगुरुजी !
रात्री उशिरापर्यंत रानावनातून मोहीमस्थळी येणार्या धारकर्यांमध्ये मोहिमेची ओढ आणि पू. गुरुजींप्रतीचा भाव जाणवत होता. धारकरी रानावनात उघड्यावर झोपत होते. मोहिमेत भौतिक सोयीसुविधा उपलब्ध नसतांनाही धारकरी सहभागी होतात. ध्येयाला समर्पित झालेले धारकरी युवक पू. भिडेगुरुजी यांनी सिद्ध केले आहेत. या सर्वच धारकर्यांकडे पाहून ‘हिंदु राष्ट्र आता दूर नाही’, असे जाणवले आणि मोहिमेच्या ठिकाणी विषय मांडण्याची संधी दिल्याविषयी पू. गुरुजींप्रती कृतज्ञता वाटली. ईश्वरकृपेने ही अविस्मरणीय मोहीम अनुभवता आली. – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
गडकोट मोहिमेला जाणार्या धारकरी बांधवांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कराड येथे स्वागत !
कराड : येथे सकाळी ९ वाजता श्रीमधुमकरंदगड ते श्रीरसाळगड या गडकोट मोहिमेत सहभागी होणार्या धारकरी बांधवांचे कराड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीशिवतीर्थ, दत्त चौक या ठिकाणी सुवासिनींद्वारे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यवाहक श्री. सागर आमले, श्री. श्रीकृष्ण पाटील, श्री. धनाजी गुरव, श्री. अनिल खुंटाळे, तसेच अनेक धारकरी बांधव उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. सविता चव्हाण, सौ. वैशाली मुळीक, सनातन प्रभातच्या वाचक सौ. अर्चना कडाके, सौ. विजया काशीत यांनी वारकर्यांचे औक्षण केले. या वेळी समितीचे श्री. मदन सावंत, सनातन संस्थेचे श्री. सुरेंद्र भस्मे उपस्थित होते.