Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहिमेचा वृत्तांत

नळदुर्ग येथील धर्मशिक्षणवर्गातील युवकांकडून राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी पोलिसांना निवेदन

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित मस्के यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी युवक

नळदुर्ग (जिल्हा धाराशिव) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे चालू असलेल्या धर्मशिक्षणवर्गातील युवकांनी उत्स्फूर्तपणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित मस्के यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त निवेदन देऊन राष्ट्र-धर्म कार्यात सहभाग नोंदवला. त्यात ‘राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखा आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा’, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या.

सर्वश्री अभी हुलगे, आदित्य गवळी, अभिषेक गवळी, विजय मोरे, किरण दुस्सा, अजय कांबळे, हनुमंत कुलकर्णी, रोहित घोडके, ज्ञानेश्‍वर कांबळे, आदित्य कोकणे, संदीप गायकवाड, सागर थोंटे, धीरज शहकरशेट्टी, उमेश अवाचर, चंद्रकांत सगरे, सोहम स्वामी, श्याम बागल, गुरुनाथ शंकरशेट्टी, सौरभ कासेकर, गजानन कुलकर्णी यांनी हे निवेदन दिले.

कराड येथील पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना  १. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तसेच उपस्थित तहसीलदार २. श्री. अमरजीत वाकडे आणि राष्ट्रप्रेमी

कराड : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर गुन्हे नोंद करावेत, तसेच जे ध्वज संहितेनुसार ध्वजाचा मान राखत नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरजीत वाकडे, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती सराटे, कराड तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांना देण्यात आले.

या वेळी हिंदू एकता आंदोलनाचे श्री. अनिल खुंटाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत, सनातन संस्थेचे सर्वश्री लक्ष्मण पवार, बाबुराव पालेकर, दीपक सिंग आदी राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समिती अभिनंदनास पात्र आहे ! – साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक, यवतमाळ

उजवीकडे साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक वाहाने यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

यवतमाळ : येथे साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक सी.एच्. वाहाने यांना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी वाहाने म्हणाले, ‘‘संपूर्ण जिल्ह्यात परिपत्रक काढण्याविषयी आदेश देऊ. समितीच्या या उपक्रमाविषयी मला माहिती आहे. या मोहिमेविषयी समिती अभिनंदनास पात्र आहे.’’

ठाणे जिल्हा, पालघर आणि बोरीवली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी प्रशासकीय अधिकारी अन् पोलीस यांना निवेदन

ठाणे : प्लास्टिकच्या तसेच कागदाच्या राष्ट्रध्वजाचा वापर झाल्यानंतर ते रस्त्यावर तसेच इतरत्र पडलेले असतात. अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी असे राष्ट्रध्वज वापरण्यास कायद्याने बंदी आहे. तसेच राज्यात प्लास्टिक बंदीचा कायदाही आहे. त्यामुळे अशा राष्ट्रध्वजांची निर्मिती आणि वापर करू नये, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी विविध उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षीही ठाणे जिल्हा, पालघर, तसेच बोरीवली येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

पालघर येथे प्रशासनाला निवेदन

निवेदन स्वीकारतांना (उजवीकडे) पालघरचे निवासी जिल्हाधिकारी संजय जाधव

पालघर : येथील निवासी जिल्हाधिकारी संजय जाधव यांना निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रप्रेमी श्री. महेश मुळे, श्री. नंदकुमार गुरव आणि समितीचे श्री. महादेव होनमोरे अन् श्री. आनंद पाटील उपस्थित होते.

बोरीवली येथेही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

बोरीवली पोलीस ठाण्यात निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

बोरीवली : येथील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी राष्ट्रप्रेमी श्री. देवांग भट, कु. अर्चना राव, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुजाता पुजारी, श्री. मंजुनाथ पुजारी हे उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात निवेदनासह प्रवचनांद्वारे जागृती

कोपरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ
नौपाडा पोलीस ठाण्यात निवेदन देतांना १ हिंदु जनजागृती समितीचे  श्री. प्रसन्न ढगे

ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, मानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय राठोड, नौपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, कोपरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांना निवेदन देण्यात आले. या उपक्रमात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यासह विविध शाळा, शिकवण्या यांमध्ये प्रवचनाद्वारे राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान रोखण्याविषयी जागृती करण्यात आली. देशाच्या भावी पिढीने क्रांतीकारकांकडून आदर्श घ्यावा, या हेतूने अंबरनाथ ‘पश्‍चिम’ येथील मोरीवली गावात प्रजासत्ताकदिनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खेड येथील प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि शाळा अन् महाविद्यालयांतून निवेदन सादर

डावीकडून श्री. संदीप धारीया, निवेदन स्वीकारतांना तहसीलदार श्रीमती प्राजक्ता घोरपडे, विलास भुवड, श्रीमती सुजाता सामंत, सर्वश्री शांताराम महसकर, नागेश धाडवे, दिनेश पोफळकर, विनोद वाडकर, कौस्तुभ तांबीटकर आणि संदीप तोडकरी
डावीकडून सनातनच्या सौ. अस्मिता भुवड, श्रीमती सुजाता सामंत आणि निवेदन स्वीकारतांना ज्ञानदीप ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा मोरे

खेड : प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन करणारे आणि त्यांची विक्री करणारे यांच्यावर कारवाई करावी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्रीमती प्राजक्ता घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खेड मधील ८ शाळा आणि महाविद्यालये यांना हे निवेदने देण्यात आली. खेड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेले निवेदन ठाणे अंमलदार श्री. चरणसिंह पवार यांनी स्वीकारले.

ही निवेदने देतांना राष्ट्रप्रेमी श्री. संदीप धारीया, हिंदु जनजागृती समितीचे विलास भुवड, श्रीमती सुजाता सामंत, शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. शांताराम महसकर, समितीचे नागेश धाडवे, श्री. कौस्तुभ तांबीटकर, राष्ट्रप्रेमी श्री. दिनेश पोफळकर, विनोद वाडकर आणि सनातनचे श्री. संदीप तोडकरी खेडमधील ८ शाळा आणि महाविद्यालये यांना निवेदने

श्रीमान चंदुलाल शेट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, एल.पी. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, एल.टी.टी. इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, योगिता डेंटल कॉलेज, आय.सी.एस्.सिनिअर कॉलेज, ज्ञानदीप ज्युनियर कॉलेज, टी.बी.के. सिनियर कॉलेज, नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या ८ शाळा आणि महाविद्यालये यांना निवेदने देण्यात आली.

ही निवेदने देते वेळी सनातनच्या साधिका सौ. महेश्‍वरी कुलकर्णी, सौ. अस्मिता भुवड, राष्ट्रप्रेमी सौ. सुषमा रेमजे आणि समितीच्या श्रीमती सुजाता सामंत या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

पनवेल : महाड आणि रोहा येथे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्रशासनाला आणि शाळांमधून निवेदने देण्यात आली.

कै. द.ग. तटकरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिरीष येरूनकर यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी

महाड

खरवली-बिरवाडी येथील शाळांमध्ये, तसेच खरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वाती म्हामूणकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्मप्रेमी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

रोहा

कोलाड येथील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रशांत तायडे आणि कै. द.ग. तटकरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शिरीष येरूनकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे रोहा तालुका उपप्रमुख श्री. चंद्रकांत लोखंडे, कोलाड विभाग शाखाप्रमुख श्री. गणेश शिंदे, दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. प्रवीण शिंदे, धर्मप्रेमी श्री. महेश शिरसाट, श्री. विष्णु महाबळे हे उपस्थित होते.

आंबेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी श्री. दिलीप मेहता यांनाही निवेदन देण्यात आले.

पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळेतील ५०० विद्यार्थ्यांचे प्रबोधन

पुणे : येथील नांदेड गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक श्री. बागुल यांना निवेदन देण्यात आले. खडकवासला येथील यशवंत विद्यालयात २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा मान राखा’ याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. पाचवी ते दहावीच्या अनुमाने ५०० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. तसेच तेथे क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. किरकिटवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका सौ. हनमघर यांनाही २६ जानेवारीचे निवेदन देण्यात आले.

पुणे जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने

पिंपरी-चिंचवडच्या महापौर सौ. उषा ढोरे (उजवीकडून दुसर्‍या) यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

पुणे – राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू ! त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही चळवळ राबवली जाते. याअंतर्गत समितीच्या वतीने विविध ठिकाणी पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात येत आहेत. भोर येथील निवासी नायब तहसीलदार श्रीमती मृदुला मोरे, भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू मोरे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

श्री. मोरे म्हणाले, ‘‘आपण करत असलेले कार्य मोलाचे आहे. केवळ आम्हाला निवेदन देऊन न थांबता सर्व वृत्तपत्रांनाही द्या. त्याने व्यापक जनजागृती होईल. समितीच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमाला सहकार्य लागल्यास आम्ही सदैव करू.’’

या वेळी प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विनायक काका सणस, धर्मप्रेमी श्री. पांडुरंग पाटील, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड परिमंडळ १ आणि २ चे पोलीस उपायुक्त, अपर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, महापौर सौ. उषा ढोरे यांना निवेदन देण्यात आले.

नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

निवेदन स्वीकारतांना निवासी उपजिल्हाधिकारी

नांदेड – १५ जानेवारी २०२० या दिवशी नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना निवेदन देण्यात आले. तसेच नांदेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के आणि नांदेड येथील शिक्षणाधिकारी यांनाही राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना अधिवक्ता हाके, अधिवक्ता पतंगे, सर्वश्री राधाकृष्ण पापंटवार, पुरभाजी तिडके, नागेश बुंदेले, गणेश कोंडलवार, रघुजीवार आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

सोलापूर, धाराशिव आणि पुणे जिल्ह्यांत प्रशासनाला निवेदन

लातूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

लातूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयीचे निवेदन येथील निवासी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांना देण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले की, हिंदु जनजागृती समिती प्रत्येक वेळी अशा विषयावर सतर्क राहून कार्यरत असते, पुष्कळ चांगले उपक्रम हातात घेते, आम्ही आमच्या बाजूने सर्व आदेश देऊ, प्लास्टिक ध्वजाची विक्री होत असल्यास त्याविषयी तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाईन चालू होते का ? या विषयी प्रयत्न करू. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले की, ‘हिंदु जनजागृती समिती आम्हाला नियमित साहाय्य करते.’ त्यांना प्लास्टिक ध्वजाविषयी आपण आपले पथक नेमू शकता, असे सांगितले तेव्हा त्यांनी ‘आम्ही निश्‍चितपणे या विषयी गस्ती पथक नेमू,’ असे सांगितले. या वेळी सर्वश्री राजीव पाटील, प्रकाश कुलकर्णी, निखिल नल्ले रेड्डी, सिद्धांत दुर्गे, अतुल शिंदे, मुकेश पवार, अजय राठोड, रत्नदीप निगुडगे, विजयकुमार वाघमारे, आत्माराम रंगवाळ, सुरेंद्र सुत्रावे, लखन वगरे, आकाश क्षीरसागर आदी राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

समितीच्या अंतर्गत बारामती, धाराशिव आणि पंढरपूर येथेही निवेदने देण्यात आली.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री बाळासाहेब शामराज, संदीप बगडी, सुरेश नाईकवाडी, कौस्तुभ जेवळीकर, धनंजय बगडी, उमेश कदम आदी उपस्थित होते.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) : येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले, तसेच प्रांताधिकारी यांच्या वतीने राजेश सावळे यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी बजरंग दलचे सुनील बाबर, पेशवे युवा मंचचे सचिव गणेश लंके, नरवीर बाजीप्रभू प्रतिष्ठानचे आनंद राणरुई, विश्‍व हिंदू परिषदेचे रवींद्र साळे (सर), सनातन संस्थेचे मोहन लोखंडे, हिंदू महासभेचे बाळकृष्ण डिंगरे, ओंकार वाटाणे, लिंगायत प्रतिष्ठानचे प्रदेश अध्यक्ष रामेश्‍वर कोरे, हिंदु जनजागृती समितीचे शशीशेखर पाटील आदी उपस्थित होते.

बारामती (जिल्हा पुणे) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयीचे निवेदन पोलीस अधीक्षक मुंडे यांना देण्यात आले, तसेच निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपाली चव्हाण, सौ. संगीता भांगे, सुजाता कल्याणकर, सौ. संगिता बोरुडे, सौ. प्राजक्ता सांगळुदकर, सौ. श्रद्धा कापशीकर आदी उपस्थित होत्या.

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीची पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी – प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा

यवतमाळ : प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार, तसेच राज्यशासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानुसार कारवाई करावी आणि जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करतात त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार आणि उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे यांच्याकडे ९ जानेवारीला निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अश्‍लाघ्य माहिती प्रसिद्ध करणार्‍या पुस्तकावर तात्काळ बंदी घालून संबंधित लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने माननीय गृहमंत्री यांना पाठवण्यात आले.

निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रांजल गावंडे, श्री. रुस्तुम चंद्रवंशी, महिला उत्थान मंडळ आणि योग वेदांत समितीच्या सौ. नीताताई मुंदाफळे, सौ. दीपाताई वैद्य, सौ. मंदाताई उके, सौ. निर्मलाताई चिंते, सौ. शांताताई डोळसकर, श्री. शिवशंकर उके, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *