श्री विजयादुर्गादेवीच्या भक्तांनो, धर्मांध पोर्तुगिजांचे वंशज अजूनही अस्तिवात आहेत, हे जाणून देवीचे प्राचीन तीर्थक्षेत्र पूर्णत: नष्ट होण्यापासून वाचवा !
काही ख्रिस्त्यांनी अनधिकृतपणे घुसून वाहने उभी करण्यासाठी ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र गौशाळा ट्रस्ट’च्या जागेतील गवत नष्ट केल्याची पोलिसात तक्रार
वास्को : पूर्वी विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या जागेत (‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेत) चर्च संस्था यंदाही सलग तिसर्या वर्षी फेस्ताचे आयोजन करत आहे. हे फेस्त १६ जानेवारी या दिवशी साजरे केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सांकवाळ येथील ख्रिस्ती समाजाच्या एका गटाने पुरातत्व जागेजवळील ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र गौशाळा ट्रस्ट’च्या जागेत अनधिकृतपणे घुसून तेथील गवत नष्ट केले आणि त्या ठिकाणी फेस्तासाठी वाहनांना पार्किंगची सुविधा उपलब्ध केली आहे. याविषयी ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र गौशाळा ट्रस्ट’ने पोलीस महासंचालकांकडे तक्रार नोंदवली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ट्रस्टने दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेच्या जवळ ‘शंखवाळ तीर्थक्षेत्र गौशाळा ट्रस्ट’ची गोशाळा आहे. ही गोशाळा वर्ष १९४४ पासून अस्तित्वात आहे आणि या ठिकाणी मोकाट गुरे पाळली जातात. येथे आता ७५ गुरे आहेत. हे कार्य ट्रस्ट स्वखर्चाने करते. गोशाळेतील गुरांसाठी ट्रस्टची ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेजवळ चरण्यासाठी जागा आहे. ४ जानेवारी या दिवशी सांतान वाझ, इलिसबाओ वाझ, फ्रान्सिस फर्नाडिस, पेद्रो डिसा, जॉनी कार्व्हालो आदींचा सहभाग असलेल्या एका ख्रिस्ती गटाने अनधिकृतपणे गुरांसाठी चरण्याची सुविधा असलेल्या या जागेत घुसून आतील गवत कापून ते चोरून नेले. या ठिकाणी लावलेली काजूची रोपटीही नष्ट केली. याविषयी ‘१००’ क्रमांकावर संपर्क करून अनेक वेळा तक्रार करण्यात येऊनही पोलीस साहाय्यासाठी आले नाहीत. (अशीच तक्रार ख्रिस्त्यांनी केली असती, तर पोलिसांनी अशीच भूमिका घेतली असती का ? ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – संपादक) जागेतील सर्व गवत चोरून नेल्याने आता गुरांना चरण्यासाठी गवत उपलब्ध नाही. यानंतर ५ जानेवारी या दिवशी उपरोल्लेखित लोकांनी पुन्हा ट्रस्टच्या जागेत अनधिकृतपणे घुसून आतमध्ये ‘वाहन पार्किंगची जागा’, असे फलक लावले. ३१ मे २०१९ या दिवशी उपरोल्लेखित व्यक्तींच्या नेतृत्वाखालील ख्रिस्ती जमावाने आपल्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश मिळवून आम्हाला मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याविषयी तक्रार नोंदवूनही संबंधितांच्या विरोधात अजूनही आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आलेले नाही. उपरोल्लेखित व्यक्तींच्या विरोधात कारवाई करावी.
‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेत यंदा तिसर्या वर्षी फेस्ताचे आयोजन; ‘सीआरझेड्’ची अनुज्ञप्ती नसतांना फेस्ताच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने बांधकाम
हिंदूंचे धार्मिक स्थळ बळकावणार्या धर्मांध ख्रिस्त्यांच्या विरोधात गोव्यातील कथित पुरोगामी, सुधारणावादी आणि मानवाधिकारवाले ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! या सर्वांची धर्मनिरपेक्षता किती बेगडी आहे, हेच यातून दिसून येते !
सांकवाळ : पूर्वी श्रीविजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या जागेत (‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेचे) चर्च संस्था यंदाही सलग तिसर्या वर्षी फेस्ताचे आयोजन करत आहे. हे फेस्त १६ जानेवारी या दिवशी साजरे केले जाणार आहे, तर या निमित्ताने ‘नोव्हेना’ना उद्या, ७ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या जागेत ‘कोस्टल रेग्युलेटरी झोन’ची (सीआर्झेड्) अनुज्ञप्ती न घेताच फेस्ताची पूर्वसिद्धता म्हणून मंडप घालण्यात आला आहे, असा आरोप स्थानिकांच्या वतीने करण्यात येत आहे. याविषयी सविस्तर माहिती देतांना स्थानिक नागरिक डॉ. कालिदास वायंगणकर म्हणाले, ‘‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही भूमी झुआरी नदीपासून ५० मीटर अंतरावर आहे आणि यासाठी येथे बांधकाम करण्यासाठी ‘सीआर्झेड्’ची अनुज्ञप्ती घेणे बंधनकारक असते; मात्र याविषयी ‘सीआर्झेड्’ कार्यालयात याविषयी चौकशी केली असता मंडप घालण्यास अनुज्ञप्ती न घेतल्याचे लक्षात आले आहे.’’
फेस्ताच्या आयोजनाला अनुसरून शासन आणि पोलीस यांचे चर्चसंस्थेला झुकते माप !
‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी फेस्ताच्या आयोजनाला अनुसरून अनधिकृतरित्या वृक्ष तोडल्याच्या प्रलंबित प्रकरणाविषयी डॉ. कालिदास वायंगणकर यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘जानेवारी २०१८ या वर्षी पहिल्यांदाच ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी फेस्ताचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या जागेच्याजवळच असलेल्या माझ्या मालकीच्या जागेतील अनेक झाडे कापण्यात आली. फेस्ताच्या निमित्ताने लोकांना वाहने उभी करता यावी, यासाठी ही झाडे कापण्यात आली. याविषयी शासकीय अधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकार्याने त्वरित अनधिकृत वृक्षतोडीवर पुढील निर्णय येईपर्यंत स्थगिती आदेश दिला; मात्र फेस्ताच्या आयोजनाला अनुसरून धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, यासाठी फेस्ताच्या पूर्वसिद्धतेसाठी ७ जानेवारी ते १६ जानेवारी २०१८ या कालावधीसाठी संबंधित शासकीय अधिकार्याने हा स्थगिती आदेश उठवला होता.
१७ जानेवारी २०१८ नंतर पुन्हा पुढील निर्णय येईपर्यंत स्थगिती आदेश असतांनाही यंदा आपल्या जागेत अनधिकृपणे येऊन (ट्रेसपासिंग) गवत कापणे आदी अनधिकृत कृत्ये करण्यात आली. याविषयी तक्रार करण्यात येऊनही पोलीस किंवा प्रशासन यांच्याकडून अपेक्षित सहकार्य लाभले नाही.’’
‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथील फलकावरील नावात ‘चर्च’ हा शब्द घुसडला
चर्च संस्थेने एक माहिती फलक लावला आहे. या फलकावर ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे नाव ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ चर्च’ असे चुकीचे लिहिले आहे. शासनाने हे वारसा स्थळ म्हणून घोषित केले, तेव्हा प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत या स्थळाचे नाव ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) असे आहे.
सेंट जोसेफ वाझ फेस्ताच्या निमित्ताने शासनाकडून १६ जानेवारी ‘रिस्ट्रीकटेड हॉलीडे’ घोषित
सेंट जोसेफ वाझ फेस्ताच्या निमित्ताने शासनाकडून १६ जानेवारी हा ‘रिस्ट्रीकटेड हॉलीडे’ घोषित करण्यात आला आहे.
पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील अतिक्रमण !
शंखवाळी तीर्थक्षेत्र हे गोव्याचे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. ते गोव्याच्या सासष्टी तालुक्यातील सांकवाळ (पूर्वीचे शंखवाळी) या गावामध्ये आहे. शंखवाळी गाव आणि त्याचे पौराणिक वैभव, याविषयी २६६ वर्षे जुन्या ‘कोंकणाख्यान’ या ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. ‘साष्टी महिमा’ या प्रकाशित पुस्तकातील अध्याय २ पृष्ठ क्रमांक ४५ ते ५६ वरील लिखाणाचे वाचन केल्यानंतर या तीर्थक्षेत्राची कल्पना येते. येथील श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर धर्मांध पोर्तुगिजांनी ५०० वर्षांपूर्वी तोडले. याच धर्मांध पोर्तुगिजांची परंपरा चर्च संस्था आणि शंखवाळी येथील ख्रिस्ती यांनी चालू ठेवली आहे, या विरोधात हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक बनले आहे.
संकलक : डॉ. कालिदास वायंगणकर, वास्तू सल्लागार
पूर्वी विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या जागेचे (‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेचे) चर्चसंस्था गेल्या २ वर्षांपासून सेंट जोसेफ वाझ यांच्या नावाने फेस्ताचे आयोजन करत आहे. १० मार्च २०१९ या दिवशी एका रात्रीत १ मोठा आणि ५ लहान ‘क्रॉस’ अनधिकृतपणे या ठिकाणी उभारण्यात आले. ‘निज गोंयकार रिव्हॉल्युशन फ्रंट’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वस्त यांनी या अनधिकृत बांधकामावर त्वरित कारवाई करण्याविषयी पुरातत्व खात्याकडे तक्रार नोंदवली आहे.
‘निज गोंयकार रिव्हॉल्युशन फ्रंट’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वस्त यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, ‘फादर लुईस आल्वारिस आणि गोव्याचे आर्चबिशप यांनी जमावाच्या सहकार्याने ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेत अनधिकृतपणे एकूण ६ क्रॉस उभारले आहेत. वास्तविक ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेत सध्या एकही चर्च नाही आणि या ठिकाणची चर्च गावातील शिंदोळी या भागात स्थलांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ हे चॅपल अनधिकृत आहे.
‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही जागा पुरातत्व खात्याने वारसा स्थळ घोषित केल्यानंतर वर्ष १९९४ मध्ये ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ हे चॅपल बांधण्यात आले. हे अनधिकृत आहे. पुरातत्व खात्याने एका रात्रीत अनधिकृतपणे उभारण्यात आलेले ‘क्रॉस’ तातडीने हटवावेत.’
केळशी येथे कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थानचे मूळ स्थान आहे आणि या ठिकाणच्या हिंदु भाविकांनी धार्मिक कृती करण्यास सुलभ व्हावे, या नात्याने एका चौथर्याचे बांधकाम केले होते. हे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर पुरातत्व खात्याच्या तत्कालीन संचालिका ब्लॉसम मडेरा यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये तक्रारीनंतर ४८ घंट्यांचा आत अनधिकृत बांधकाम मोडले होते. पुरातत्व खात्याने ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करण्याविषयी हीच तत्परता दाखवावी, असे ‘निज गोंयकार रिव्हॉल्युशन फ्रंट’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वस्त यांनी तक्रारीत नमूद केले होते; मात्र या तक्रारीला आता ८ मास उलटूनही पुरातत्व खात्याने यावर कोणतीच कारवाई केलेली नाही.
ख्रिस्ती फादरचा उद्दामपणा !
पुरातत्व जागेत भाविकांनी जाऊ नये, यासाठी स्थानिक फादरने त्या ठिकाणी ‘गेट’ उभारून त्याला कुलुप ठोकणे
‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही पुरातत्व भूमी असली, तरी ते एक सार्वजनिक ठिकाण आहे. या ठिकाणी भेट देण्यास पुरातत्व खात्याचा आक्षेप नाही. एका तक्रारीला अनुसरून १५ डिसेंबर २०१७ या दिवशी पुरातत्व खात्याने दिलेल्या उत्तरात ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे, तरीही या पुरातत्व जागेला हिंदु भाविक किंवा इतर यांनी भेट देऊ नये, यासाठी स्थानिक फादरने चालू वर्षी या ठिकाणी ‘गेट’ उभारून त्याला टाळे ठोकले आहे.
स्थानिक फादर आणि चर्चसंस्था यांच्या या अनधिकृत कृत्यामुळे स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण
स्थानिक फादर आणि चर्चसंस्था यांच्या ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व भूमीत अनधिकृतपणे ‘क्रॉस’ची उभारणी करणे आणि या भूमीला कोणीही भेट देऊ नये, यासाठी त्या ठिकाणी ‘गेट’ उभारून त्याला टाळे ठोकणे, या प्रकारांमुळे स्थानिक हिंदूंमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या अनधिकृत कृतीवर शासनाने त्वरित कारवाई न केल्यास या ठिकाणी पुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
न्यायालयाच्या निवाड्यामुळे पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या धार्मिक स्थळी उत्सव साजरा करण्याचा हिंदूंचा मार्ग मोकळा !
‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व भूमीत चर्च संस्था गेल्या २ वर्षांपासून फेस्ताचे आयोजन करत आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नुकत्याच एका निवाड्यात ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व भूमीत केवळ फेस्ताचे आयोजन केल्याने पुरातत्व जागेला कोणतेही हानी पोचू शकत नसल्याचे म्हटले आहे. माननीय न्यायालयाच्या या निवाड्यामुळे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या पुरातत्व भूमीत श्री विजयादुर्गादेवीच्या भाविकांना एखादा उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे जाणकारांचे मत आहे. यादृष्टीने भाविक प्रयत्नशील आहेत.
– डॉ. कालिदास वायंगणकर, शंखवाळी, कुठ्ठाळी, गोवा.