हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी संघटितपणे अन् वैध मार्गाने केलेल्या विरोधाचा परिणाम !
मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणार्या ‘अॅमेझॉन’ या आस्थापनाकडून हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्या ‘टॉयलेट मॅट’ची (पायपोसची) विक्री चालू करण्यात आली होती. याचा हिंदूंकडून विरोध केला जात होता. हिंदुत्वनिष्ठांनी ट्विटरवर ‘#BoycottAmazon’ हा ‘हॅशटॅग ट्रेंड’ चालू केला होता. तसेच हिंदु जनजागृती समितीने प्रखर विरोध करत त्याच्या विरोधात ऑनलाईन मोहीमही राबवली. ‘अॅमेझॉनने ही उत्पादने मागे घेऊन जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी करण्यात आली होती. या विरोधानंतर अॅमेझॉनने काही घंट्यांतच या उत्पादनांची विक्री थांबवली.