धुळे : येथे ११ आणि १२ जानेवारी असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता झाली. अधिवेशनाला जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक येथील विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी, मंदिरांचे विश्वस्त, कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
अधिवेशनाच्या दोन्ही दिवसांमध्ये संत, हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी व्यक्त केलेले जाज्वल्य विचार आणि परिसंवादात झालेल्या चर्चेचा सारांश येथे प्रसिद्ध करत आहोत.
‘मंदिर संस्कृती रक्षण’ या विषयावरील परिसंवादाचा सूर (११ जानेवारी २०२०)
सरकारने केवळ हिंदूंच्या मंदिरांचे नव्हे, तर अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचेही अधिग्रहण करावे !
‘मंदिर संस्कृती रक्षण’ या विषयावरील परिसंवादात प्रा. गणेश सोनवणे, अधिवक्ता राजेश गडे, सनदी लेखापाल श्री. गोवर्धन मोदी, श्री. सुनील घनवट यांनी सहभाग घेतला. ज्याप्रमाणे मदरशांमधून धर्मशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे मंदिरांतूनही धर्मशिक्षण देणारी ‘गुरुकुल शिक्षणपद्धत’ चालू करावी. सरकारीकरण केलेल्या मंदिरांच्या निधीतून देशातील ऐतिहासिक मंदिरांचा जीर्णोद्धार व्हायला हवा. मंदिरांची सेवा करण्यातील ‘सेवाभाव’ सरकारीकरण केलेल्या मंदिरांतून दिसत नाही. केवळ नोकरी म्हणून त्याकडे पाहिले जाते. सरकारीकरणामुळे अन्य धर्मीय अधिकारी मंदिराचे विश्वस्त होतात; मात्र मशीद आणि चर्च येथे असे होत नाही. सुरक्षेच्या नावाखाली मंदिरांची परंपरा खंडित करण्याचे रचले जाणारे षड्यंत्र रहित करावे. मंदिरे भक्तांच्या कह्यात द्यावीत. मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात संविधानाची घटनादुरुस्ती करून स्थायी स्वरूपात अधिनियम घालायला हवा. ‘एक भारत अभियान : मंदिर संस्कृती रक्षणासाठी’ हे अभियान भारतभर चालू करण्याचे निश्चित करण्यात आले. (परिसंवादाचे ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे प्रक्षेपण करण्यात आले.)
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सरकारकडे मागणी केल्यास वर्ष २०२३ पूर्वीच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याचा विश्वास परिसंवादातील हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्त
अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना संवैधानिक कि असंवैधानिक ?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात पुढील चर्चा झाली.
आजपर्यंत हिंदूंच्या कायद्यांत अनेक पालट करण्यात आले; मात्र अन्य धर्मियांच्या कायद्यात तसे पालट करण्यास सरकार धजावत नाही. आणीबाणीच्या काळात वर्ष १९७६ मध्ये ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता’ हे दोन शब्द घालण्यात आले. आतापर्यंत संविधानात १०० हून अधिकवेळा पालट करण्यात आले आहेत. ‘पुन्हा एक दुरुस्ती करून त्यात ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द घालावा’, अशी एकमुखी मागणी या परिसंवादातून करण्यात आली. संविधानानुसार स्वतंत्र न्यायव्यवस्था असतांनाही ’शरियत कायद्या’ची मागणी केली जाते. ज्याप्रमाणे भ्रष्टाचाराच्या विरोधातील ‘जनलोकपाल’ विधेयक पारित करण्यास समाजसेवक अण्णा हजारे यांनी तत्कालीन सरकारला भाग पाडले, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सरकारकडे मागणी केल्यास वर्ष २०२३ पूर्वीच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, असा विश्वास सर्वांच्या मनात निर्माण झाला.
क्षणचित्रे
१. ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून १५ सहस्रांपेक्षा अधिक लोकांपर्यंत अधिवेशनाचा विषय पोचला.
२. लंडन येथील धर्मप्रेमीने लाईव्ह परिसंवादाचा लाभ घेतला.
३. उपस्थित सर्व धर्मप्रेमींमध्ये कुटुंबभावना जागृत झाल्याचे जाणवले.
४. अधिवेशन समारोपाच्या वेळी आभार सत्रात अनेक हिंदुत्वनिष्ठांना गहिवरून आले.
सहभागी संस्था-संघटना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना, भाजप, श्रीरामनवमी जन्मोत्सव समिती, जनभूमी फाउंडेशन, सम्राट मित्रमंडळ, मंगळग्रह मंदिर न्यास, श्री एकविरा देवी मंदिर, श्री भोले बाबा परिवार, श्रीराम मित्र मंडळ, हिंदु एकता आंदोलन पक्ष, सुवर्णकार समाज, योग वेदांत सेवा समिती यांसह अधिवक्ता आणि उद्योगपती आदी सहभागी झाले होते.
विशेष
अधिवेशनासाठी श्री. संतोष अग्रवाल, श्री. कल्पेश अग्रवाल, श्री. विशाल अग्रवाल यांनी सभागृह, तसेच निवास आणि अधिवेशनासाठी लागणारे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.
सभागृहाच्या मालकांचा कृतीशील प्रतिसाद
अधिवेशन पाहून ‘श्रीकृष्ण रिसॉट’चे मालक म्हणाले, ‘‘जे कार्य तुम्ही करत आहात, ते पुष्कळ महान आहे. तुमच्या तुलनेत आम्ही काहीच करत नाही. तुम्हाला यापुढेही आमचे नेहमी सहकार्य असेल. कधीही कोणतेही कार्यक्रम घ्यायचे असतील, तर मी ही जागा उपलब्ध करून देईन. तुम्ही कधीही येथे कार्यक्रम घेऊ शकता.’’
अभिप्राय
१. अधिवेशनात वेगळी प्रेरणा आणि शक्ती प्राप्त झाली, याविषयी मी अत्यंत आभारी आहे. येथील प्रत्येक जण निःस्वार्थीपणे, आनंदाने सेवा करतो. असे मी आजपर्यंत कोठेच पाहिलेे नाही. शिस्त आणि संस्कार प्रत्यक्ष अनुभवता आले. येथून पुढे प्रत्येक गावात धर्मजागृती सभांचे आयोजन करीन. साधू-संत काय असतात, ते सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या रूपाने अनुभवता आले. – ह.भ.प. रवींद्र पाठक
२. हलाल प्रमाणपत्राविषयी अधिकाधिक जागृती करीन आणि धर्मसभांचे आयोजन करीन. – श्री. रवींद्र बच्छाव, मालेगाव
३. आमच्या जीवनाला नवसंजीवनी मिळाली आहे. ‘सेक्युलर’ म्हणजे नेमके काय ?, हे आज कळले. हा विषय घराघरात पोचवण्यासाठी मी प्रयत्न करीन. – डॉ. माधुरी