Menu Close

समाजवादी पक्षाचे नेते मुस्लिम खान टेकेदार यांनी नरोत्तम सिंह बाघेल या हिंदूला मारहाण करून त्यांच्या तोंडावर लघवी केली !

समाजवादी पक्षाचे नेते मुस्लिम खान टेकेदार यांचे क्रौर्य !

दादरी प्रकरणी आकांडतांडव करणारे पुरोगामी आणि समाजवादी या घटनेवर मात्र तोंड उघडणार नाहीत; कारण तसे करणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात कृती करणे, असेच त्यांना वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

आग्रा : उत्तरप्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षाचे आग्रा शहराध्यक्ष मुस्लिम खान टेकेदार यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह ५ एप्रिलच्या रात्री नरोत्तम सिंह बाघेल या गरीब व्यक्तीला मारहाण करून त्यांच्या तोंडावर लघवी केली. शहरातील एतमादपूर येथे ही संतापजनक घटना घडली. या प्रकरणी बाघेल यांनी प्रविष्ट केलेल्या तक्रारीवरून टेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

१. पीडित नरोत्तम सिंह बाघेल म्हणाले, मी मार्गाने जात होतो. त्या वेळी मुस्लिम खान टेकेदार यांचे वडील हाजी पुन्नी यांना मी जाण्यासाठी वाट देण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी मला शिवीगाळ केली, तसेच टेकेदार अन् अन्य लोकांना बोलावून मला मारहाण केली. याशिवाय मुस्लिम खान, अस्लम, मुवीन आणि अन्य लोकांनी माझ्या तोंडावर लघवी केली.

२. बाघेल यांचे आरोप फेटाळत मुस्लिम खान टेकेदार म्हणाले, बाघेल दारूच्या नशेत होते आणि त्यांनी माझ्या वडिलांना शिवीगाळ केली. माझे वडील मानसिकदृष्ट्या पीडित आहेत. त्यामुळे मी बाघेल यांना मारहाण केली; मात्र त्यांच्या तोंडावर लघवी केली नाही. माझ्या विरोधात पोलिसांत जबाब देण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेचे नेते बाघेल यांच्यावर दबाव आणत आहेत.

३. विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम खान टेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *