Menu Close

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने

कोल्हापूर : मकरसंक्रांतीचे औचित्य साधून येथे ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने घेण्यात आली. यात संक्रातीचे महत्त्व, तिळगूळ देण्याचे महत्त्व, तसेच अन्य माहिती देण्यात आली.

१. मुडशिंगे (हातकणंगले तालुका) गावात हनुमान मंदिरात प्रवचन झाले. येथे सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरणही करण्यात आले. याचे नियोजन शिवसेनेचे ग्राहक कक्ष जिल्हाप्रमुख श्री. दीपक यादव, श्री. शरद पवार, तसेच सरपंच सौ. मीनाक्षी खरशिंगे आणि शिवसेना महिला आघाडीच्या सौ. राधा शिंगाडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

२. शिरोली येथे झेंडा चौकात श्री. अंकेलकर यांच्या घरी आणि जत्राट येथे श्री गणेश मंदिरात प्रवचन घेण्यात आले. बहिरेश्‍वर, नागाव, शिरोली येथेही प्रवचने घेण्यात आली. बहुतांश ठिकाणी धर्मशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.

सांगली : सांगलीवाडी येथे धर्मप्रेमी सौ. वैशाली पवार यांच्या घरी सनातन संस्थेच्या साधिका सौ. संपदा अमित पाटणकर यांनी प्रवचन घेतले. उपस्थित महिलांनी विषय आवडला. त्यांनी शास्त्रानुसार कृती करणार असल्याचे सांगितले.

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *