Menu Close

हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा ! – सौ. वैशाली परांजपे, सनातन संस्था

सभेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

नागपूर : हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करा आणि श्रद्धेने धर्माचरण करा. देव असल्याची प्रचीती तुम्हाला आल्याविना राहणार नाही. टिळा लावणे, वाढदिवस तिथीनुसार साजरा करणे, हस्तांदोलन न करता नमस्कार करणे, फीत कापून उद्घाटन न करता नारळ वाढवून करणे अशा लहान-लहान कृतींतून धर्माचरण करून आपला धर्म आणि संस्कृती यांविषयीचा अभिमान वृद्धींगत करू शकतो, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. वैशाली परांजपे यांनी केले. हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात साधना आणि धर्माचरण यांचे महत्त्व विशद करतांना त्या बोलत होत्या.

येथील चिखलीचा राजा, श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात १२ जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.  या सभेला पुष्कळ धर्माभिमानी उपस्थित होते.

ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेमुळे विश्‍वकल्याण होणारच आहे ! – पराग बिंड, हिंदु जनजागृती समिती

श्री. पराग बिंड

आमच्यासाठी राष्ट्र आणि धर्म वेगळे नाहीत. आमचे धर्मपुरुष हे राष्ट्रपुरुष आहेत. आम्ही देवतांचे चरण धुतांना सुद्धा ‘या राष्ट्राला बळ प्राप्त होऊ दे’, असा मंत्र म्हणतो त्यामुळे ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेमुळे राष्ट्र आणि विश्‍व कल्याण होणारच आहे, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग बिंड यांनी उपस्थित धर्मप्रेमींसमोर केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *