बसुर्ते, जिल्हा बेळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा
बेळगाव : देशातील सध्याच्या प्रतिकूल स्थितीत आपण केवळ संतांच्या कृपाशीर्वादाने जिवंत आहोत. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ रहाण्याएेवजी संत हेच खरे देशद्रोही आहेत, त्यांना गंगा नदीत फेकून द्या, अशी कृतघ्नपणाची भाषा करणार्या बिहारमधील पप्पू यादव या खासदाराला या देशातील संतभक्त अरबी समुद्रात बुडवल्याविना रहाणार नाहीत, अशा शब्दांत संतद्वेष्ट्या खासदारांना श्री. मनोज खाडये यांनी खडसवले.१३ मार्च २०१६ या दिवशी झालेल्या बेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेतून प्रेरणा घेऊन बसुर्ते येथील धर्माभिमानी युवकांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. अलका पाटील याही उपस्थित होत्या.
बसुर्ते या गावातील धर्माभिमानी युवकांनी सभेचे दायित्व घेऊन केवळ ४ दिवसांत प्रसार करून ४०० हून अधिक धर्माभिमानी नागरिकांना एकत्रित केले. सभेची सर्व व्यवस्था याच युवकांनी पुढाकार घेऊन केली. सनातन संस्थेच्या सौ. अलका पाटील यांचा सत्कार बसुर्ते ग्रामपंचायत सदस्या सौ. शीतल सुर्वे यांनी, तर श्री. मनोज खाडये यांचा सत्कार श्री. रघुनाथ चंद्रकांत घुमटे यांनी केला. या वेळी सौ. अलका पाटील यांनी धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद या धर्मावरील संकटांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
सभेसाठी श्री. प्रमोद सुरेश नाईक यांनी बांबू, ध्वनीक्षेपक आणि व्यासपीठ साहित्य उपलब्ध करून दिले, तसेच श्री. बेनके बंधूंनी जागा उपलब्ध करून दिल्यासाठी त्यांचे आभार मानण्यात आले.
क्षणचित्रे
१. १ सहस्र ५०० लोकसंख्या असणार्या गावातून ४०० हून अधिक धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
२. सभेपूर्वी गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीचे निधन होऊनही अनेक गावकर्यांनी सभा चालू करण्यास सांगितले.
३. आढावा बैठकीसाठी ५० हून अधिक तरुण उपस्थित होते. त्यांनी कृतीशील होण्याची उत्स्फूर्त सिद्धता दर्शवली.
४. रामनवमीला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे अयोध्येत विधीवत् पूजन होण्याच्या निवेदनावर ग्रामस्थांनी सभा संपल्यावर थांबून स्वाक्षर्या केल्या.
५. सभेपूर्वी ४ घंटे मुसळधार पाऊस पडूनही अल्प कालावधीत गावातील युवकांनी सभेची सिद्धता केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात