भोपाळ (मध्यप्रदेश) : साधकांच्या साधनेत वृद्धी व्हावी आणि त्यांना धर्मजागृतीविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने येथे ४ आणि ५ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मप्रसार अन् साधनावृद्धी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी शिबिरार्थींना साधनेविषयी, तर हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच गुणवृद्धी करण्यासाठी आवश्यक प्रयत्न’ या विषयांवर मार्गदर्शन केले. समाजाला साधना शिकवण्यासाठी आणि धर्मशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याविषयी या शिबिरात ठरवण्यात आले. या शिबिराचा भोपाळ आणि इंदूर येथील शिबिरार्थींनी लाभ घेतला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोपाळमध्ये ‘धर्मप्रसार आणि साधनावृद्धी शिबिर’
Tags : Hindu Janajagruti Samiti