Menu Close

‘आंध्रप्रदेश सरकारने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली बस भाडेवाढ त्वरित रहित करावी !’

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलन करतांना समितीचे कार्यकर्ते आणि स्वाक्षरी करणारे तरुण-तरुणी

यवतमाळ : यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी दत्त चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘आंध्रप्रदेश सरकारने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने यात्रांवर केलेली बस भाडेवाढ त्वरित रहित करावी’, अशी मागणी करण्यात आली. यासमवेत काश्मिरी हिंदूंचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी केंद्रशासनाकडे करण्यात आली. या निवेदनांवर स्वाक्षर्‍या घेऊन यवतमाळ येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाच्या वेळी निवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी रस्त्यावरील तरुण-तरुणींनी एकच गर्दी केली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *