Menu Close

सोलापूर : नंदीध्वज मिरवणुकीमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून भाविकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा !

समितीच्या वतीने नंदीध्वजाचे पूजन

विविध मान्यवरांची समितीच्या कक्षाला भेट

सोलापूर : येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेनिमित्त काढलेल्या नंदीध्वज मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीळगूळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच सोलापूर येथे १२ फेब्रुवारी या दिवशी भवानी पेठ येथील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे निमंत्रणही देण्यात आले. येथील आजोबा गणपति मंदिराजवळ समितीच्या वतीने कक्ष उभारण्यात आला होता. मिरवणुकीतील नंदीध्वज गणपति मंदिराजवळ आल्यावर समितीच्या वतीने नंदीध्वजाचे पूजन करण्यात आले.

समितीच्या कक्षावर सर्वश्री तुलसीदास चिंताकिंदी, कृष्णहरी क्यातम, गणेश मार्चला, लक्ष्मण मादगुंडी, उमाकांत नांदर्गी आदी धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सेवा केली, तर हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, मिनेष पुजारे, सौ. दुर्गा कुलकर्णी, कु. वर्षा जेवळे यांसह समितीच्या अन्य कार्यकर्त्यांनी भाविकांना शुभेच्छा देऊन सभेचे निमंत्रण दिले. या वेळी अनेक मान्यवरांसह अधिवक्ता रमाकांत बापट यांनी समितीच्या कक्षाला सहकुटुंब भेट दिली, तर कक्षावर आलेल्या सुवासिनींना हळद-कुंकू लावून तीळगूळ देण्यात आले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *