Menu Close

हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या शौर्यजागरण उपक्रमाचा अमरावती नगरपालिकेच्या वतीने समारोप

प्रशिक्षित युवतींच्या प्रात्यक्षिकांतून क्षात्रतेज जागृत झाले !

शौर्यजागरण उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या युवती

अमरावती : येथील विलासनगर प्रभागातील नगरसेविका सौ. सोनाली करेसिया यांनी स्थानिक युवतींना स्वरक्षणाच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले होते. शौर्यजागरण उपक्रमाच्या अंतर्गत प्रतिदिन सायंकाळी २ घंटे असे २५ दिवस युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. शेवटच्या दिवशी, म्हणजे १२ जानेवारीला युवादिनाच्या दिवशी २५ दिवस स्वरक्षणाचे धडे घेतलेल्या युवतींनी सर्वांसमोर कराटे, लाठीकाठी, दंडसाखळी इत्यादींची प्रात्याक्षिके करून दाखवली. या वेळी युवतींनी ‘हर हर महादेव’, ‘झाशीच्या राणीचा विजय असो’ अशा प्रकारच्या घोषणा उत्साहाने दिल्या. त्यामुळे समारोपाच्या प्रसंगी  युवतींमध्ये ‘क्षात्रतेज जागृत झाल्या’चे सर्वांना जाणवले.

या वेळी व्यासपिठावर उपमहापौर सौ. कुसूमताई साहू, माजी उपमहापौर श्री. प्रवीण काशीकर, नगरसेविका सौ. सोनाली करेसिया, भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री. सतीश करेसिया, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे उपस्थित होते.

मुलींचा आत्मविश्‍वास बघून पुष्कळ आनंद झाला ! – सौ. सोनाली करेसिया, नगरसेविका

या वेळी नगरसेविका सौ. सोनाली करेसिया म्हणाल्या, ‘‘भाग्यनगर येथील युवतीच्या हत्येची घटना घडल्यानंतर मला माझ्या भागातील मुलींनी आत्मरक्षणाचे धडे घ्यायला हवेत’, असे वाटत होते. हिंदु जनजागृती समितीने या उपक्रमामध्ये दिलेल्या स्वरक्षणाच्या प्रशिक्षणामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली. माझ्या प्रभागातील मुलींचा आत्मविश्‍वास बघून मला पुष्कळ आनंद झाला आहे.’’

कु. प्रीती गडलिंग आणि कु. प्रतिक्षा करेसिया यांनी व्यक्त केलेले मनोगत

स्वरक्षणाच्या प्रकारांमुळे आत्मविश्‍वास वाढला !

या २५ दिवसांत शिकवलेल्या स्वरक्षणाच्या प्रकारांमुळे आमच्यात आत्मविश्‍वास वाढला आहे. आमच्यावर वाईट प्रसंग आल्यास निर्भीडपणे आम्ही त्याचा प्रतिकार करू शकतो. याआधी आम्हाला कुलदेवीविषयी कोणीच माहिती दिली नव्हती. हिंदु जनजागृती समितीमुळे आम्हाला कुलदेवीची उपासना, कुंकू लावण्याचे महत्त्व आणि इतर धर्माचरणाच्या कृती समजल्या. नामजप चालू केल्यामुळे अभ्यासात एकाग्रता वाढली असून आम्हाला स्थिर आणि शांत वाटू लागले आहे.

विशेष

१. वर्गात येणार्‍या युवतींनी स्वतःहून उत्साहाने प्रशिक्षक कु. शबरी देशमुख यांना सरस्वतीदेवीची आणि श्री. गिरीश जामोदे यांना श्री गणेशाची मूर्ती भेट दिली.

२. व्ही.सी.एन्. केबल वाहिनीने स्वतःहून उपक्रमाची बातमी घेऊन ती प्रसिद्ध केली.

३. ‘श्री. नीलेश टवलारे व्यासपिठावर बोलतांना मला त्यांच्या ठिकाणी शक्ती जाणवत होती.’ असे प्रशिक्षणवर्गात येणार्‍या एका युवतीचे वडील श्री. संजय वाघमारे यांनी सांगितले.

४. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्गात येणारी कु. अद्विती डंबाळे हिने केले.

५. या प्रसंगी क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले होते.

‘मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावणे’ ही हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला मिळालेली पोचपावतीच !

मुलींचे जीवन दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालले आहे. काही दिवसांपूर्वी अमरावती येथे एका मुलीवर आक्रमण झाले होते. सद्यस्थितीत मुलींमध्ये स्वरक्षणाविषयी जागृती निर्माण होणे आणि त्यांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी अमरावती शहरात प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक शौर्यजागरण उपक्रमाचे आयोजन करत आहेत. २५ दिवस चालणार्‍या या उपक्रमामध्ये अनेक ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे हे उपक्रम स्तुत्य आहेत ! – सौ. कुसूमताई साहू, उपमहापौर

हिंदु जनजागृती समितीचे हे उपक्रम स्तुत्य आहेत. अशा प्रकारचे आयोजन प्रत्येक भागात होणे आवश्यक आहे. मी माझ्या प्रभागातही अशा प्रकारचे आयोजन करणार आहे, असे कौतुकास्पद मनोगत उपमहापौर सौ. कुसूमताई साहू यांनी या वेळी व्यक्त केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *