पुणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
पुणे : वर्ष १९९० मध्ये जिहादी धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंवर अनन्वित अत्याचार करत ९० सहस्र हिंदूंची कत्तल केली, तसेच हिंदूंची मंदिरे, घरे, भूमी, संपत्ती बळकावून उरलेल्या साडेचार लखांहून अधिक हिंदूंना काश्मीर खोर्यातून हाकलून लावले. आपल्याच देशात काश्मिरी हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. १९ जानेवारी २०२० या दिवशी या घटनेला आता ३० वर्षे पूर्ण होत आहेत, तरी अद्याप विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन झालेले नाही. काश्मिरी हिंदू अद्यापही न्यायापासून वंचित आहेत. तरी काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी केली. त्या १९ जानेवारी या दिवशी येथील अलका टॉकीज चौकात आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र्रीय हिंदू आंदोलना’त बोलत होत्या.
हिंदू जागृत नसल्याने त्यांच्यावर जिझिया कर लादला जात आहे ! – मोहनराव डोंगरे
आंध्रप्रदेश सरकारने मकरसंक्रांतीच्या काळात बसच्या भाड्यामध्ये ५० टक्के वाढ केली. संक्रांतीपूर्वी झालेल्या नाताळच्या काळात ही दरवाढ करण्यात आली नव्हती. हिंदू जागृत नसल्यानेच त्यांच्यावर जिझिया कर लावण्याचे धाडस होते. सत्तेचे राजकारण करण्यासाठीच असा प्रकार होत आहे. हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात आम्ही लढत राहू. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ हा मंत्र सिद्ध करू !
आपली संस्कृती जपण्यासाठी हिंदु राष्ट्र साकार करणे आवश्यक ! – विद्याधर नारगोलकर
जेव्हा वर्ष १९८९ मध्ये व्ही.पी. सिंह यांचे सरकार आले, तेव्हा पहिल्यांदा एक मुसलमान व्यक्ती गृहमंत्री झाली. त्यानंतर चारच दिवसांत त्यांच्या मुलीचे अपहरण झाले. त्या बदल्यात ८ अतिरेकी सोडले गेले. गुलाम नबी आझाद यांच्या मुलाचे अपहरण झाले. त्याला सोडवण्यासाठी २७ अतिरेकी सोडण्यात आले आणि ही मालिका पुढे चालू झाली. त्यानंतर थोड्याच दिवसांत पद्धतशीरपणे मशिदीतून बांग देऊन काश्मीरमधून हिंदूंना हुसकावून लावण्यात आले. अजूनही काश्मिरी हिंदू विस्थापितांचे जीवन जगत आहेत. आपली संस्कृती जपण्यासाठी हिंदु राष्ट्र साकार करणे आवश्यक आहे, असे श्री. विद्याधर नारगोलकर यांनी सांगितले.