चंद्रपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
चंद्रपूर : रामसेतू बांधतांना खारीनेही आपला वाटा उचलला आहे तसेच आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धन यांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे श्री. विद्याधर जोशी यांनी ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना सांगतांना सांगितले. ते चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे १२ जानेवारीला रामलीला भवनमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये बोलत होते. या वेळी सौ. सत्याली देव यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली तर सूत्रसंचालन सौ. दिपाली सिंगाबट्टी यांनी केले.
सनातन संस्थेच्या सौ. मंगला दर्वे यांनी साधनेचे महत्त्व सांगितले. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. साधनेची सुरुवात धर्माचरणापासून म्हणजेच वाढदिवस तिथीनुसार साजरा करणे यांसारख्या कृती करून करणे आवश्यक आहे. धर्माचरणानेच आपल्याला ईश्वराचे पाठबळ मिळते.’’
क्षणचित्रे
१. ‘केबल सर्च’ टी.व्ही. चे वार्ताहर श्री. अमित राऊत यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनिचित्रीकरण केले. कार्यक्रमाच्या उद्देशाविषयीची ‘बाईट’ घेतली.
२. हिंदु राष्ट्र-जागृती सभेकरिता श्री. विनोद दांडेकर यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. समाजातील धर्मप्रेमींनी साधकांसाठी अल्पाहार, चहा तसेच महाप्रसाद इत्यादींची विनामूल्य व्यवस्था करून दिली.