अमरावती : काश्मिरी हिंदूंना जशा यातना भोगाव्या लागल्या आणि त्यांच्या भूमीमधून पलायन करावे लागले, त्याप्रमाणे भारतात इतरत्रच्या हिंदूंंची स्थिती होऊ नये यासाठी स्वतःची सिद्धता करा अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सज्ज व्हा. आज हिंदु धर्मावर अनेक प्रकारची आक्रमणे होत आहेत. या संकटांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंचे संघटन करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे, हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत खत्री यांनी केले. वडाळी गावात १९ जानेवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पाडली. त्या वेळी ते बोलत होते. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून या सभेचा आरंभ करण्यात आला. या सभेला २५० धर्मप्रेमी उपस्थित होते.
वीरांगनांचा आदर्श घेऊन नराधमांना धडा शिकवा ! – सौ. अनुभूती टवलारे, रणरागिणी शाखा
पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आज हिंदु युवती धर्माचरण आणि आपल्या वीरांगना यांचा आदर्श विसरत चालल्या आहेत. त्यामुळेच नराधमांच्या अत्याचाराला त्या बळी पडत आहेत. स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन आणि धर्माचरण करून या नराधमांना धडा शिकवायला हवा, तसेच ‘लव्ह जिहाद’सारख्या संकटांपासून दूर रहायला हवे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांनी या वेळी केले.
विशेष
वडाळी गावात या हिंदु राष्ट्र-जागृती सभेची मागणी तेथील धर्मप्रेमींनी एका बैठकीमध्ये उत्स्फूर्तपणे केली होती. त्याप्रमाणे सभेचा प्रसार, आयोजन, प्रत्यक्ष सिद्धता या सर्व सेवांमध्ये येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सभेच्या प्रचारार्थ १८ जानेवारी या दिवशी वाहन फेरी काढण्यात आली होती.