मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष !
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या तीर्थयात्रा रहित होतात, तर हज यात्रेला अनेक वर्षे अब्जावधी रुपयांचे अनुदान मिळत राहते ! काँग्रेसची हीच ढोंगी धर्मनिरपेक्षता आहे !
भोपाळ (मध्यप्रदेश) : मध्यप्रदेश सरकारकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’च्या अंतर्गत १५ फेब्रुवारीपासून वैष्णोदेवी, काशी, द्वारका आणि रामेश्वर येथे ५ रेल्वेगाड्यांमधून ४ सहस्र वृद्ध हिंदु यात्रेकरू तीर्थाटनाला जाणार होते; मात्र सरकारने कोणतेही कारण न देता ही यात्रा रहित केली. ही योजना वर्ष २०१२ मध्ये भाजपच्या सरकारच्या काळात चालू करण्यात आली होती.
१. याविषयी राज्याचे मंत्री गोविंद सिंह यांनी म्हटले की, ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ कायमस्वरूपी रहित केली पाहिजे; कारण धार्मिक यात्रा आयोजित करण्याचे काम सरकारचे नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे. श्रद्धाळूंना सुविधा देणे, त्यांना साहाय्य करणे, हे ठीक आहे; मात्र सरकारी पैशांद्वारे अशा यात्रांचे आयोजन करणे माझ्या मते योग्य नाही.
तीर्थयात्रा प्रत्येकाने स्वतः कमावलेल्या पैशांतून केली पाहिजे. (हज यात्राही स्वतःच्या कमावलेल्या पैशांतून करणे अपेक्षित असतांना काँग्रेस सरकारने अनेक वर्षे यासाठी हज यात्रेकरूंना अनुदान दिले, तेव्हा हे त्यांना ठाऊक नव्हते का ? कि हिंदूंच्याच यात्रांच्यासंदर्भात त्यांना याची आठवण होते ? – संपादक) योजना रहित केल्याने वाचणारे पैसे शिक्षण, आरोग्य आदी योजनांसाठी व्यय केले पाहिजेत.
२. भाजपचे आमदार विश्वास सारंग यांनी गोविंद सिंह यांच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेस पक्ष आणि सरकार यांनी त्यांचे धोरण स्पष्ट करावे, अशी मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात