सोलापूर येथे ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ या विषयावर उद्योजक आणि व्यापारी यांची बैठक
सोलापूर : सध्याच्या काळात इस्लामी अर्थव्यवस्था ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’चा आग्रह धरून उद्योजकांना ते घेण्यास भाग पाडत आहे; पण ही इस्लामी अर्थव्यवस्था काही दिवसांनी ‘हलाल सर्टिफिकेट’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा उभारून मुसलमानांना बिनव्याजी कर्ज देईल आणि हिंदु उद्योजकांपेक्षा अल्प दरात मुसलमानांना उत्पादने उपलब्ध करून देऊन हिंदूंचे उद्योग बंद पाडेल. हिंदु उद्योजकांसाठी हा मोठा धोका या ‘हलाल सर्टिफिकेट’च्या माध्यमातून निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, तसेच ‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्या ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम’ या संघटनेने विविध आतंकवादी आक्रमणांच्या घटनांतील आरोपी मुसलमानांसाठी कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून दिले असून एकूण ७०० जणांचे खटले जमियत लढवत आहेत. त्यामुळे आतंकवादाला बळ देणारी अर्थव्यवस्था मोडीत काढा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते ५ फेब्रुवारी या दिवशी येथील सुशील रसिक सभागृहात ‘हलाल सर्टिफिकेट’ या विषयावर झालेल्या उद्योजकांच्या बैठकीत बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. दत्तात्रय पिसे, तसेच सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते.
या बैठकीला टेक्सटाईल, मूर्तीकार, विविध क्षेत्रांतील घाऊक (होलसेल) आणि किरकोळ क्षेत्रांतील व्यापारी संघटना यांचे प्रतिनिधी, नगरसेवक, प्रसिद्ध मंदिरांचे पुजारी, सनदी लेखपाल, अर्थविषयक कर सल्लागार, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील संघटनांचे अध्यक्ष, पत्रकार अशा विविध आर्थिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी सनातन-निर्मित ‘अध्यात्म’ आणि ‘आयुर्वेद’ या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
क्षणचित्रे
१. काहींनी बैठकीनंतर आवर्जून भ्रमणभाष करून ‘बैठकीचा विषय योग्य आणि चांगला होता’, असे सांगितले.
२. एका उद्योजकांनी ‘ओळखीच्या व्यापार्यांना हा विषय माहिती होण्यासाठी त्यांच्यासाठी बैठकीचे आयोजन करू’, असे सांगितले.
३. एका उद्योजकांनी ‘हलाल सर्टिफिकेट’ला आमचा विरोध दर्शवण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिण्यासाठी मार्गदर्शन करा, आम्ही सर्वजण पंतप्रधानांना पत्र पाठवू’, असे सांगितले.
४. ‘हलाल सर्टिफिकेट’ हा विषय भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रूजलेला आहे, हे तुमच्यामुळेच आम्हाला समजले. व्यापारात आम्ही अनुभवी असूनही आम्हाला हा विषय ठाऊक नाही. ‘हिंदु जनजागृती समिती सतर्क असून समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे’, अशी प्रतिक्रिया एका उद्योजकांनी व्यक्त केली.
५. एका उद्योजकांनी भ्रमणभाष करून सांगितले की, बैठकीच्या वेळी वातावरणात चैतन्य जाणवत होते आणि वैयक्तिक जीवनातील ताणतणाव अल्प झाला होता. कार्यक्रमानंतर घरी गेल्यानंतरही मन शांत जाणवत होते.
६. एका उद्योजकांनी सांगितले की, हिंदूंनी ‘हलाल प्रमाणपत्र’ असलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा. बहिष्कार घालण्यासाठी हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती व्हायला हवी.