Menu Close

मला हिंदु असल्याचा अभिमान आहे ! – पाकचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया

धर्मांध महिलेकडून इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन

इस्लामी राष्ट्रात हिंदूंची दुस्थिती जाणा ! भारतात एखाद्या मुसलमान खेळाडूला हिंदूने असे आवाहन केले आहे का ? जर असे केले असते, तर निधर्मीवाद्यांनी हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवले असते आणि ‘भारताला हिंदु राष्ट्र करण्याचा प्रयत्न होत आहे’, अशी आवई उठवली असती !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे माजी हिंदु धर्मीय क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांना आमना गुल नावाच्या एका महिलेने ट्विटरवरून इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन केले होते. ‘इस्लामविना जीवनामध्ये काहीच नाही’, असे या महिलेने म्हटले होते. त्यावर दानिश कनेरिया यांनी लगेच उत्तर दिले. त्यांनी म्हटले, ‘तुमच्याप्रमाणे यापूर्वी अनेकांनी मला असे सांगितले होते; मात्र त्यांना यश मिळाले नाही.’

अन्य एकानेही त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले आणि ‘तुम्ही पाकमध्ये असुरक्षित नाही ना ?’, असे विचारले होते. त्यावर कनेरिया यांनी उत्तर दिले, ‘मला हिंदु असल्याचा अभिमान आहे. मी येथे सुरक्षित आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *