सातत्याने विविध माध्यमांतून हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याचे असे प्रकार घडत आहेत. कठोर कायदा करून कठोर दंड केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !
(हा व्हिडियो दर्शविण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने प्रसिद्ध केला आहे. – संपादक)
मुंबई – ‘सुपर शक्ती मेटालिक्स’ या इमारतींच्या बांधकामासाठी लागणार्या टी.एम्.टी. बार्स (लोखंडी सळ्या) बनवणार्या आणि विकणार्या आस्थापनाचे दूरचित्रवाहिन्यांवरून विज्ञापन प्रसारित आहे. या विज्ञापनात भगवान इंद्र, विश्वकर्मा देवता आणि नारदमुनि यांचा अवमान करण्यात आला आहे.
काय आहे विज्ञापनात ?
या विज्ञापनामध्ये दाखवले आहे की, देवराज इंद्र यांच्या उपस्थितीत स्वर्गलोकामधील सभेसमोर काही अप्सरा नृत्य सादर करत आहेत. तेव्हा छताचा काही भाग खाली कोसळतो. तरीही त्या नृत्य सादर करतात; मात्र पुन्हा काही भाग कोसळल्यावर त्या नृत्य थांबवतात. हे पाहून भगवान इंद्र विचारतात, ‘‘हे काय चालू आहे ?’’ त्यावर विश्वकर्मा देवता म्हणतात, ‘‘हलक्या प्रतीच्या टी.एम्.टी. बार्सचा वापर केल्याचा हा परिणाम आहे.’’ तेव्हा इंद्रदेव विचारतात, ‘‘याचे समाधान काय आहे ?’’ तेव्हा नारदमुनि तेथे प्रकट होतात आणि ते म्हणतात, ‘‘याचे समाधान ‘सुपर शक्ती टी.एम्.टी. बार्स हे आहे. ते शक्तीशाली आहे.’’ यानंतर पुन्हा नृत्य चालू होते. शेवटी नारदमुनि म्हणतात, ‘‘नाचा नाचा, आता देवलोकही सुपर शक्तीमुळे सुपर शक्तीशाली झाला आहे.’’
या विज्ञापनाचा धर्मप्रेमी विरोध करत आहेत.
ई-मेल : [email protected]
Facebook : https://www.facebook.com/supershaktitmtsaria/
Twitter : https://twitter.com/supershakti_tmt
दूरभाष क्रमांक : (०३४३) २५५२५९८, ६५३०२६४, २५५३२८४
संयत मार्गाने निषेध करा !
निषेधामागचा मुख्य उद्देश वैचारिक परिवर्तन करणे, हा आहे. त्यामुळे कोणाचाही निषेध करतांना तात्त्विक सूत्रांच्या आधारे वैचारिक स्तरावर करा ! चुकणार्याला चुका सांगून योग्य मार्गावर आणणे, हा दृष्टीकोन निषेधामागे हवा !