Menu Close

तिरूमला तिरूपती देवस्‍थानाचे ईसाईकरण रोखण्यासाठी #SaveTirupatiFromMissionaries हा हॅशटॅग राष्‍ट्रीय ट्रेंड मधे प्रथम स्‍थानी

तिरूमला तिरूपती देवस्‍थानाचे ईसाईकरण रोखा : धर्मप्रेमी हिंदुंची ट्‍विटर वर मागणी

आंध्रप्रदेश येथील हिंदुंचे प्रसिद्ध श्रद्धास्‍थान असलेल्‍या तिरूमला तिरूपती देवस्‍थानांत ख्रिस्‍ती धर्माचा प्रसार करणार्‍या अनेक घटना घडत आल्‍या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिरुमला तिरुपती देवस्‍थानाच्‍या संकेतस्‍थळावरून ख्रिस्‍ती प्रार्थनेचा प्रसार होत असल्‍याचे निदर्शनास आले होते. हिंदुत्‍वनिष्ठांच्‍या विरोधानंतर ती प्रार्थना काढण्‍यात आली. परंतु यात प्रश्‍न असा उपस्‍थित होतो की, हिंदु देवस्‍थानाच्‍या वेबसाइट वर ईसाई प्रार्थना कशी काय आली ?

याआधीही देवस्‍थानाच्‍या वेबसाइट वर एका धार्मिक पुस्‍तिकेची पीडीएफ अपलोड करण्‍यात आली होती. यामध्‍ये देखील येशू ख्रिस्‍ताचा उल्लेख झालेला आढळून आला होता. त्‍याचबरोबर आंध्र प्रदेश वाहतूक मंडळाकडून तिरूमला ते तिरूपती या बस सुविधेच्‍या तिकिटांच्‍या मागे जेरूसलेम यात्रेचे विज्ञापन प्रकाशित करण्‍यात आले होते. तसेच मे २०१८ मध्‍ये तिरूपती देवस्‍थानाच्‍या कारभारात मोठा घोटाळा होत असल्‍याचे तेथील पुजार्‍याने सांगितले होते. या सर्व घटना बघता तिरूपती येथे ईसाई धर्माचा प्रसार जोर पकडू लागला आहे. हे हिंदुंच्‍या धर्मांतरणाचे एक षड्यंत्रच चालले आहे.

याचाच विरोध म्‍हणून दिनांक ४ डिसेंबर २०१९ रोजी धर्मप्रेमी हिंदु तसेच बालाजीभक्‍तांनी ट्‍विटर वर #SaveTirupatiFromMissionaries हा ट्‍विटर ट्रेंड यशस्‍वी केला. यामध्‍ये तिरूपती देवस्‍थानात कशाप्रकारे ईसाई आपल्‍या धर्माचा प्रसार करत आहे, याविषयी जागरूकता करणार्‍या ट्‍विट्‍स धर्मप्रेमींकडून करण्‍यात आल्‍या. तसेच तिरूपती देवस्‍थानात अहिंदु कर्मचार्‍यांची नेमणूक करण्‍याचा व मंदिर सरकारीकरण केल्‍याचा हा परिणाम आहे, असे अनेकांनी आपले मत ट्‍विटद्वारे व्‍यक्‍त केले.

हा ट्रेंड काही मिनिटांतच राष्‍ट्रीय ट्रेंड च्‍या शीर्ष १० मध्‍ये येऊन प्रथम स्‍थानी आला. काही वेळाने तो द्वितीय स्‍थानी स्‍थिरावला. सुमारे २ तास द्वितीय स्‍थानी कायम होता. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत ३० सहस्रहून अधिक ट्‍विट्‍स या ट्रेंडमध्‍ये झाल्‍या होता.

हिंदू जनजागृतीने ट्विटद्वारे केल्या खालील मागण्या,

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *