Menu Close

युवा पिढीला व्‍यवनाधीन बनवणार्‍या ‘सनबर्न’ला देशाबाहेर हाकलण्यासाठी #BanSunburnFestival या ट्रेंडद्वारे मागणी

गोव्‍यात ‘सनबर्न’ फेस्‍टीवल ला मिळालेली तत्‍कालीक परावानगी रद्द करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

देशभरात ट्रेंड झालेला #BanSunburnFestival हा राष्‍ट्रीय ट्रेंड मध्‍ये प्रथम स्‍थानी

दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०१९ या कालावधीत सनबर्न उत्‍सवाचे गोव्‍यात आयोजन करण्‍यात आले आहे. मागील वर्षी गोव्‍यात परवानगी न मिळाल्‍याने सनबर्नच्‍या आयोजकांना पुण्‍यात स्‍थलांतर करावे लागले. सनबर्नचा इतिहास पहाता अनेक चुकीच्‍या गोष्‍टी यामध्‍ये समोर आल्‍या आहेत.

सनबर्नमध्‍ये इलेक्‍ट्रॉनिक संगीतच्‍या नावाखाली सर्रासपणे ड्रग्‍स सारख्‍या अमली पदार्थांची विक्री तसेच सेवन केले जाते. तसेच मद्य पिऊन युवक-युवती गाण्‍यावर नाच करतात. अशातच आतापर्यंत मादक द्रव्‍याचे अतिसेवन केल्‍याने मार्च २०१९ मध्‍ये हैद्राबाद येथे झालेल्‍या सनबर्न मध्‍ये सहभागी झालेला आंध्र प्रदेश येथील एक युवक तर डिसेंबर २००९ मध्‍ये गोवा येथे झालेल्‍या सनबर्न मध्‍ये बेंगलौर येथील एका युवतीचा मृत्‍यु झाला आहे. यासोबतच सनबर्न च्‍या आयोजकांनी करोडो रूपयांचा कर थकवला आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्‍यामुळे देशाची युवा पिढी रसातळाला नेणार्‍या तसेच युवकांना अमली पदार्थांच्‍या आहारी नेणार्‍या सनबर्न उत्‍सवावर कायमची बंदी घालावी, अशी मागणी ट्‍विटर जोर पकडू लागली आहे.

अशातच दिनांक १४ डिसेंबर रोजी ट्‍विटर वर #BanSunburnFestival हा ट्‍विटर ट्रेंड झाला. या ट्रेंड मध्‍ये जनतेने सनबर्नचे भयावह वास्‍तव समाजासमोर मांडले व त्‍यावर बंदीची मागणी केली गेली. तसेच गोवा सरकारने यंदा गोव्‍यात सनबर्न ला दिलेली परवानगी रद्द करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे गोवा समन्‍वयक श्री. मनोज सोलंकी यांनी केली आहे.

#BanSunburnFestival हा ट्रेंड राष्‍ट्रीय ट्रेंड मध्‍ये प्रथम स्‍थानी आला होता. साधारण अर्धा घंटा प्रथम स्‍थानी राहिल्‍यावर नंतर तो द्वितीय स्‍थानी गेला.

हिंदू जनजागृती समिती ने ट्विटद्वारे गोवा चे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगावकर यांना केलेली मागणी,

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *