Menu Close

जाहिरातीत शूरवीर मराठा योद़्‍ध्‍यांचा उपहास उडवल्‍याने ट्‍विटर वर ट्रेंड झाला #BoycottNirma

#BoycottNirma राष्‍ट्रीय ट्रेंड मध्‍ये चौथ्‍या स्‍थानी

वीर मराठा मावळ्‍यांचा अपमान करणारी जाहिरात मागे घेऊन निरमा लिमिटेड आणि अक्षय कुमार यांनी जाहीर क्षमा मागावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी.

नुकत्‍याच प्रसारित झालेल्‍या निरमा पावडर च्‍या जाहिरातीमध्‍ये वीर मराठा संस्‍कृतीचा अपमान करण्‍यात आला आहे. या जाहिरातीत अभिनेता अक्षय कुमार ला एका राजाच्‍या भूमिकेत दाखवले आहे. त्‍याच्‍यासोबत अनेक मराठा मावळ्‍यांना मळलेल्‍या कपड्यांमध्‍ये दाखवले आहे. हे कपडे पाहून राणी नाराज होते. त्‍यावर अक्षय कुमार तिला म्‍हणतो, महाराजांच्‍या सेनेला शत्रूंची धुलाई पण ठाऊक आहे, आणि कपड्यांचीही’’. यावर एक मराठा योद्धा येऊन अक्षय कुमार ला विचारतो, ‘मग आपल्‍या पार्टी चे काय ?’ त्‍यावर अक्षय कुमार म्‍हणतो, ‘पार्टी पण होईल आणि धुलाई पण’. त्‍यानंतर राजा आणि सर्व मराठा योद्धे एका गाण्‍यावर नाचत निरमा पावडर ने कपडे धुताना दाखवले आहे.

हिंदवी स्‍वराज्‍यासाठी आपल्‍या प्राणांचे बलीदान देणार्‍या वीर मावळ्‍यांना अशाप्रकारे प्रकारे नाचत कपडे धुताना दाखवून त्‍यांचा उपहास उडवला आहे. धर्मप्रेमींच्‍या ही गोष्‍ट लक्षात येताच या जाहिरातीचा सोशल मिडियातून विरोध सुरु झाला आहे.

या विरोधाच्‍या पार्श्‍वभूमीवर ट्विटर वर #BoycottNirma हा हॅशटॅग भारतात ट्रेंड झाला. या ट्रेंड मध्‍ये धर्मप्रेमींनी निरमा पावडर तसेच अक्षय कुमार यांचा विरोध करणार्‍या ट्‍विट्‍स करत त्‍यांना वीर मराठ्यांचा इतिहास सांगितला. याचबरोबर निरमा पावडर लिमिटेड आणि अक्षय कुमार यांनी अपमान केल्‍याप्रकरणी जाहीर क्षमा मागावी आणि सर्व ठिकाणांहून ही जाहिरात काढून टाकावी, अशी मागणीही धर्मप्रेमींनी केली.

तीव्र विरोधामुळे ८ जनवरी रोजी सकाळी #BoycotttNirma हा राष्ट्रीय ट्रेंड बनला. हा ट्रेंड साधारण २ घंटे चौथ्‍या स्‍थानी होता. त्‍यानंतर बराच वेळ तो ५ व्‍या स्‍थानावर होता. वृत्त लिहेपर्यंत या ट्रेंडमध्‍ये २७ हजारांहून अधिक ट्विट्‍स झाल्‍या आहेत.
या ट्रेंडची दखल अनेक प्रसारमाध्‍यमांनी घेतली. यामध्‍ये आज तक, जनसत्ता, दैनिक भास्‍कर, नवभारत टाइम्‍स, न्‍यूज १८, बीबीसी मराठी, एनडीटीव्‍ही, इंडिया डॉटकॉम, फ्री प्रेस जर्नल, उदयवाणी, लेटेस्‍ट एलवाय, द वीक यांचा समावेश आहे.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *