Menu Close

कश्‍मीरी हिंदू विस्‍थापनदिन निमित्त ट्विटर वर ट्रेंड झालेला #Justice4KashmiriHindus

#Justice4KashmiriHindus हा हॅशटॅग प्रथम स्‍थानी

काश्‍मीरमध्‍ये सुरक्षित वातावरण निर्माण करून काश्‍मिरी हिंदूंचे कायमस्‍वरूपी पुनर्वसन करावे – हिंदु जनजागृती समितीची ट्‍विट्‍स द्वारे मागणी

१९ जानेवारी १९९० च्‍या रात्री कश्‍मीर मध्‍ये धर्मांधांनी जिहाद पुकारून तेथील हिंदुंना पळवून लावले. मस्‍जिदीतून घोषणा देत, हिंदुंसमोर ‘पळून जा, इस्‍लाम कबूल करा अन्‍यथा मरायला तयार रहा’ असे तीन पर्याय होते. सुमारे ५ लाख कश्‍मीरी हिंदुंना विस्‍थापित व्‍हावे लागले तसेच जिहाद्यांकडून हजारो हिंदुंच्‍या हत्‍या करण्‍यात आल्‍या, महिलांवर बलात्‍कार करण्‍यात आले. अशी सर्व स्‍थिती असतानाही कश्‍मीरी हिंदुंच्‍या मदतीला कोणी धावून आले नाही. आज या घटनेला ३० वर्षे पूर्ण झाली पण अद्याप कश्‍मीरी हिंदु आपल्‍याच देशात विस्‍थापितांचे जीवन जगत आहेत.

अशा कश्‍मीरी हिंदुंचे आतातरी पुनर्वसन करून त्‍यांना कश्‍मीर मध्‍ये स्‍थान द्यावे, अशी सरकार कडे मागणी करत आज ट्‍विटर वर #Justice4KashmiriHindus हा हॅशटॅग ट्रेंड झाला. यामध्‍ये भारतभरातील हिंदुंकडून काश्‍मीरी हिंदुंवर झालेले अत्‍याचार, दुरावस्‍था तसेच त्‍यांना न्‍याय मिळवून देण्‍याची मागणी करणार्‍या ट्‍विट्‍स करण्‍यात आल्‍या.

दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ट्‍विटर वर #Justice4KashmiriHindus हा हॅशटॅग ट्रेंड होताच तो काही वेळातच प्रथम स्‍थानी आला. त्‍यानंतर बराच काळ तो द्वितीय स्‍थानी कायम होता. शेवटचे वृत्त लिहेपर्यंत या ट्रेंडमध्‍ये ६२ सहस्रहून अधिक ट्‍विट्‍स झाल्‍या होत्‍या.

हिंदू जनजागृती समितीने ट्विटद्वारे केल्या पुढील मागण्या,

ट्रेंड मधील काही ट्विट्स पुढे देत आहे, 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *