Menu Close

महाकाल मंदिराचा मार्ग अडवून सीएए विरोधी आंदोलन करणार्‍यांचा ट्‍विटर वर देखील झाला विरोध

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे श्री महाकालेश्‍वर मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे षड्यंत्र

ट्‍विटर वर #ShaheenBaghInUjjain हा ट्रेंड १३व्‍या स्‍थानी

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील बेगमबाग मार्गावर काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांच्या विरोधात धर्मांधांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे येथील ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्‍वर मंदिरात जाण्यासाठी भाविकांना अडचण येत आहे. यामुळे या आंदोलनाच्या विरोधात ‘श्री महाकालेश्‍वर भक्तगण संघर्ष समिती’ने प्रशासनाकडे मार्ग रिकामा करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे शहराच्या काझीने म्हटले आहे की, धरणे आंदोलन समाप्त करण्यात येणार नाही. ते चालूच राहील, तर जिल्हाधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, भाविकांना मार्गावरून जाण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे.

हा मार्ग ८० फूट रुंद आहे आणि त्यातील ५० फूट जागेवर तंबू ठोकून आंदोलन करण्यात येत आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, २१ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. त्या वेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी हा मार्ग रिकामी करणे आवश्यक आहे.

उज्जैन येथील प्रसिद्ध ज्‍योतिर्लिग महाकाल मंदिराच्‍या मार्गावर अल्‍पसंख्‍यांकांकडून सीएए च्‍या विरोधात धरणे आंदोलन केले जात आहे. यामध्‍ये ८० फूटाच्‍या चौपदरी रस्‍त्‍यापैकी ५० फूट जागेवर हे आंदोलन सुरु आहे. त्‍यामुळे भाविकांची येण्‍या-जाण्‍याची गैरसोय होत आहे. हे पाहून याचा विरोध ट्‍विटर वर झालेला दिसून आला. दिनांक २९ रोजी #ShaheenBaghInUjjain हा हॅशटॅग (एकाच विषयावर ट्विटरवर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड (एकाच विषयावर सहस्रावधी लोक चर्चा करतात, त्‍याला ट्रेंड’ म्‍हणतात.) झाला. यामध्‍ये १० सहस्रहून अधिक ट्‍विट्‍स झाल्‍या होत्‍या. यासोबतच ‘महाकाल’ हा शब्‍द देखील काही वेळासाठी ८ व्‍या स्‍थानी होता.

ट्रेंड मध्ये केलेल्या काही ट्विट्स पुढे देत आहे,

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *