Menu Close

‘शिकारा’ चित्रपटाद्वारे विधु विनोद चोप्रा यांनी काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळले ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई : नुकताच ‘विनोद चोप्रा फिल्म’ने निर्मिती केलेला ‘शिकारा’ चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट काश्मिरी हिंदूंच्या जीवनावर आधारित असल्याचे चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या वेळी सांगण्यात आले. तसेच प्रत्येक फलकामध्ये (पोस्टरमध्ये) ‘शिकारा – द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मिरी पंडीत्स’ असे लिहिण्यात आले; मात्र चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी चित्रपटाच्या ‘पोस्टर’मध्ये ‘शिकारा – अ टाइमलेस लव्ह स्टोरी इन द वर्स्ट ऑफ टाइम’ असा पालट करण्यात आला.

तसेच प्रत्यक्ष चित्रपटात काश्मिरी हिंदु महिलांवर बलात्कार झालेच नाहीत, हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच काश्मिरी हिंदू या ठिकाणी मारले गेले, एकही मंदिर धर्मांधांनी उद्ध्वस्त केले नाही, असे धादांत खोटे चित्रण दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात सहस्रो काश्मिरी हिंदूंच्या क्रूर हत्या, शेकडो काश्मिरी हिंदु माता-भगिनींवर बलात्कार, सहस्रो मंदिरांची मोडतोड आणि तब्बल साडेचार लाख काश्मिरी हिंदूंचे विस्थापन इतका भयंकर आणि रक्तरंजित इतिहास असतांना तो दडपण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी केला आहे. काश्मिरी हिंदूंच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी विधु विनोद चोप्रा यांनी ३० वर्षांपूर्वीच्या जखमा उकरून काढून त्यावर मीठ चोळले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले आहे.

विधु विनोद चोप्रा यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालावा !

श्री. शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराची प्रथमच बॉलीवूडने नोंद घेतली, असे प्रथमदर्शनी वाटले होते. प्रत्यक्षात मात्र चित्रपटात धर्मांधांमध्ये ‘भाईचारा’ वृत्ती दाखवण्यात आली असून, त्यांच्यातील भारतद्वेषावर प्रकाश टाकण्यात आलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे काश्मिरी हिंदू पुन्हा काश्मिरात जाऊ शकता, असे आशादायी चित्रण केलेले नाही. चित्रपटामध्ये काश्मिरी हिंदूंविषयी अत्यंत अयोग्य भूमिका घेतल्याचे पाहायला मिळते. हे काश्मिरी हिंदूंवर पुन्हा एकदा मानसिक अत्याचार केल्यासारखेच आहे. या चुकीला भारतीय समाज कधीही क्षमा करणार नाही. त्यामुळे विधु विनोद चोप्रा यांच्या चित्रपटावर बहिष्कार घालावा, असेही आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. शिंदे यांनी केले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *