चेन्नई : पुरासवक्कम येथील मुरदीस हॉटेलमध्ये २६ जानेवारी २०२० या दिवशी शिवसेनेकडून स्थानिक शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या वेळी उपस्थित शिवसैनिकांसाठी ‘स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. बालाजी कोला यांनी ‘स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनात त्यांनी ‘दैनंदिन जीवनात आपल्याकडून कोणत्या चुका होतात त्याची नोंद करणे, त्या चुकांमागे कोणता स्वभावदोष आहे, हे शोधून काढणे आणि दोष न्यून करण्यासाठी स्वयंसूचना घेणे’, याविषयी माहिती दिली. उपस्थित शिवसैनिकांनी अत्यंत जिज्ञासेने हा विषय जाणून घेतला. श्री. जी. राधाकृष्णन्जी आणि श्री. मुथुकृष्णन्जी यांना सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी सनातनने प्रकाशित केलेले तमिळ भाषेतील ग्रंथ भेट दिले.
चेन्नई येथे शिवसेनेच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वभावदोष निर्मूलनाविषयी मार्गदर्शन
Tags : Hindu Janajagruti Samiti