केरळमधील साम्यवादी सरकारच्या मुसलमानबहुल सरकारी शाळेतील प्रकार
केरळमध्ये मंदिरांमध्ये इफ्तार पार्टी केली, तर तो धार्मिक सौहार्द ठरतो; मात्र मुसलमान विद्यार्थ्यांचा भरणा असलेल्या सरकारी शाळेत श्री सरस्वतीदेवीच्या चित्रांचे वाटप केल्यास ती धर्मांध कृती ठरते, असे केरळ सरकार समजते, हे यातून स्पष्ट होते !
थिरूवनंतपूरम् (केरळ) : केरळमधील एका सरकारी शाळेच्या २ शिक्षकांनी ‘गणित प्रार्थना’, तसेच श्री सरस्वतीदेवी आणि ‘ओम’ यांचे चित्र असलेल्या माहितीपत्रिकेचे वाटप केल्यामुळे त्यांच्या कृतीचा निषेध म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. काही दिवसांपूर्वी ही पत्रिका शहराच्या उपनगरातील अझीकोड सरकारी शाळेत वितरित करण्यात आली होती. या शाळेत ८० टक्के विद्यार्थी मुसलमान आहेत, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
१. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि पालकांनी शाळेवर मोर्चा काढून या दोन्ही शिक्षकांना काढून टाकण्याची मागणी केली. पालक-शिक्षक संघटनांनीही अशीच मागणी केल्यानंतर मुख्याध्यापकांनी या २ शिक्षकांना रजेवर जाण्याचे निर्देश दिले.
२. ५ वी ते ७ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना ही पत्रिका वाटण्यात आली. ‘गणित प्रार्थना केल्यामुळे मुलांना गणित शिकण्यास साहाय्य झाले असते’, असे शिक्षकांना वाटते. (कॉन्व्हेंट शाळांमध्ये ख्रिस्ती नसणार्या मुलांनी येशूची केलेली प्रार्थना खपवून घेतली जाते; मात्र सरकारी शाळांमध्ये ‘गणित प्रार्थना’ चालत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) या शिक्षकांपैकी एक असणार्या शिक्षिका राजलक्ष्मी यांनी ‘गणित प्रार्थना’ या १२ ओळींच्या प्रार्थनेचे लेखन केले होते.
३. साहाय्यक शैक्षणिक अधिकारी राज कुमार यांनी या शाळेला भेट दिली. त्यांनी सांगितले की, पालक-शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक यांच्या अहवालासह याविषयाचा सविस्तर अहवाल लवकरच सामान्य शिक्षण संचालकांकडे सादर केला जाईल.
४. प्रार्थना लिहिणार्या राजलक्ष्मी यांनी ‘मला धमकी दिली गेली आहे आणि दूरभाषवरून त्रास दिला जात आहे’, अशी तक्रार पोलिसांत केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments