जमशेदपूर (झारखंड) : हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी सुंदरनगर येथील शिवमंदिरात ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. येथील धर्मप्रेमी श्री. विष्णु अग्रवाल यांनी या प्रवचनाचे आयोजन केले होते. येथील जुगसलाई येथील श्री सत्यनारायण मंदिरात ‘राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती’ आणि ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि मूलभूत संकल्पना’ यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीच्या व्यापक कार्याविषयी ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन येथील धर्माभिमानी श्री. अमित सारदा यांनी केले.
बिस्टुपूर येथील महाराष्ट्र हितकारी मंडळात ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना आणि आवश्यकता’ याविषयीच्या शंका विचारून त्याचे निरसन करून घेतले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र हितकारी मंडळाचे विश्वस्त श्री. दीपक पुरंदरे यांनी सहकार्य केले.
पू. सिंगबाळ यांनी येथील उद्योजक, व्यावसायिक, अधिवक्ता, मंदिर समितीचे विश्वस्त यांच्यासह अन्य धर्मप्रेमी हिंदूंना संपर्क करून त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती केली. या वेळी त्यांच्यासमवेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभु गवारे हेही उपस्थित होते.