Menu Close

तरुण हिंदू संघटनेकडून नवाटांड (झारखंड) येथे हिंदूसंघटन मेळाव्याचे आयोजन

अशी मागणी करावी लागायला हा भारत आहे कि पाक ? हिंदूंवर अन्याय करणार्‍या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी शासन काय करणार आहे ? हिंदूंनो, तुमच्या धर्मबांधवांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटितपणे आवाज उठवा !

धर्मांधांपासून आमचे रक्षण करा ! – नवाटांड येथील ग्रामस्थांची भाजपकडे कळकळीची मागणी

hindu_unity1नवाटांड (झारखंड) : धर्मांधांपासून आमचे रक्षण करा, अशी कळकळीची मागणी येथील ग्रामस्थांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांकडे येथे आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात केली. येथील तरुण हिंदू या हिंदुत्ववादी संघटनेने या मेळाव्याचे नुुकतेच आयोजन केलेे होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिंह, गिरीडीह लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामप्रसाद महंतो, तसेच भाजप आणि रा.स्व. संघ यांचे कार्यकर्ते अन् पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी ग्रामस्थांनी धर्मांधांकडून त्यांच्यावर करण्यात आलेले अत्याचार, तसेच धर्मांधांच्या दहशतीमुळे मंदिरात पूजा-आरती करतांना येणार्‍या अडचणी आदी व्यथा मांडल्या आणि साहाय्य करण्याची मागणी केली. रामनवमीच्या वेळी मुसलमानांकडून आमच्यावर पुन्हा आक्रमण होऊ शकते, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावर चंद्रशेखर सिंह यांनी ग्रामस्थांना कोणत्याही परिस्थितीत ग्रामस्थांच्या पूजा करण्याच्या अधिकारावर बाधा येणार नाही, असे आश्‍वासन दिले.

१६ जानेवारी या दिवशी गावकरी येथील मंदिरात पूजा-आरती करत असतांना ३०० हून अधिक धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण केले होते. या आक्रमणात पुरुषांसह महिला आणि लहान मुलांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती; मात्र त्यांना जामीन मिळाल्यावर त्यांनी हिदूंच्याच विरोधात न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली. परिणामी गावातील हिंदू अद्यापही मुसलमान आणि पोलीस यांच्यामुळे भयग्रस्त आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *