Menu Close

हिंदुत्वनिष्ठांची प्रशासन आणि केंद्रीय गृहमंत्री यांजकडे निवेदनांद्वारे आणि आंदोलनाद्वारे मागणी

  • ‘शिकारा’ चित्रपटाचे प्रमाणपत्र परिनिरीक्षण मंडळाने रहित करून त्यावर बंदी घालावी ! 
  • देशविरोधी कारवायांत गुंतलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घाला !
  • नागरिकत्व कायद्याच्या विरोधात शाहीन बाग येथील आंदोलन करणार्‍यावर कारवाई करा !

विधु विनोद चोप्रा यांनी निर्मिलेला ‘शिकारा’ हिंदी चित्रपट म्हणजे काश्मिरी हिंदूंच्या जखमेवर मिठ चोळण्याचा अश्‍लाघ्य प्रकारच आहे. या चित्रपटाचे प्रमाणपक्ष परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) रहित करून त्यावर बंदी घालावी. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे भारतीय मुसलमानांच्या नागरिकतेला कोणताही धक्का नसूनही ‘भारतीय मुसलमानांना हद्दपार करण्यात येईल’, असा खोटा प्रचार करून देशाची कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यात येत आहे. संपूर्ण देशात या कायद्याविरुद्धच्या आंदोलनात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने १२० कोटी रुपये व्यय केले आहेत. हा आंतरराष्ट्रीय विषय असल्याने याची ‘एन्.आय.ए.’कडून चौकशी करण्यात येऊन देशद्रोही शक्तींना लगाम घातला पाहिजे अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी निवेदनांद्वारे आणि आंदोलनाद्वारे प्रशासन आणि केंद्रीय गृहमंत्री यांजकडे केली.

वाराणसी येेथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वाराणसी (उत्तरप्रदेश) : हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी येथील शास्त्रीघाट, वरुणापूल येथे देहलीत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार करणार्‍यांच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. या वेळी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. हा हिंसाचार या संघटनेकडून करण्याचा आल्याचा दावा करण्यात येत आहे. या वेळी सर्व संघटनांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी रणविजय सिंह यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला हिंदू युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे, केंद्रीय पूजा समितीचे अध्यक्ष वाराणसी न्याय मंच व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्री. तिलकराज मिश्रा, ‘इंडिया विथ विजडम’चे अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता विकास श्रीवास्तव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

वर्धा येेथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

  • नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलन करणार्‍या धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करावी ! : हिंंदु जनजागृती समितीची मागणी
  • राजुरा (जिल्हा चंद्रपूर), चंद्रपूर, गडचिरोेली येथेही शासनाला निवेदन

वर्धा : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काही दिवस हिंसक आंदोलन करून सामान्यांना वेठीस धरणार्‍या शाहीन बाग येथील धर्मांधांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या आणि देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार घडवून आणणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेवर बंदी घालावी आणि वषर्र् १९९० मध्ये काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांविषयी समाजाची दिशाभूल करणार्‍या ‘शिकारा’ या चित्रपटाचे प्रमाणपत्र सेन्सॉर बोर्डाने रहित करून त्यावर बंदी घालावी, या मागण्यांसाठी २५ फेेब्रुवारी या दिवशी येथील विकास भवनासमोर राष्ट्रीय हिंंदू आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देण्यात आले. याच मागण्यांसाठी समितीच्या वतीने चंद्रपूर येथे उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, गडचिरोली येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना निलठुबे आणि राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनाही निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अनुप चौधरी, हितेश निखार, जगदीश इंगोले, संजीव हरदास, सौ. विजया भोळे, सौ. माधुरी चिमूरकर, सौ. तुलसी सब्राह आदी धर्माभिमानी सहभागी झाले होते.

उपजिल्हाधिकारी श्री. सुनील कोरडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना
निवेदन स्वीकारतांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती कल्पना निलठुबे
निवेदन स्वीकारतांना राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील तहसीलदार डॉ. रवींद्र होळी

बेंगळुरू येथील आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी

प्रसारमाध्यमांसमोर आंदोलनाची भूमिका मांडतांना श्री. मोहन गौडा
आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

बेंगळुरू येथील मैसुरू बँक सर्कलजवळ हिंदु जनजागृती समिती, श्रीराम सेना, आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी श्रीराम सेनेचे बेंगळुरू अध्यक्ष श्री. चंद्रशेखर, केसरी युवपडेचे (भगवा युवक दलाचे) श्री. सुशांत पुजारी, आझाद सेनेचे श्री. सुभाष यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांना देण्यासाठी निवेदन बेंगळुरू येथील जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले.

राजापूर आणि दापोली येथे हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रप्रेमी यांच्याकडून प्रशासन आणि केंद्रीय गृहमंत्री यांजकडे निवेदनांद्वारे मागण्या

राजापूर येथे डावीकडून नायब तहसीलदार कमलाकर दाभोलकर यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ

राजापूर : १४ फेब्रुवारी २०२० या दिवशी याविषयीचे निवेदन केंद्रीय सांस्कृतिकमंत्री भारत सरकार यांना देण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन येथील महसुली नायब तहसीलदार कमलाकर दाभोलकर यांनी स्वीकारले.

दापोली येथे डावीकडून नायब तहसीलदार सुरेश चंद्रकांत खोपकर यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

दापोली : येथील निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी सुरेश चंद्रकांत खोपकर यांना वरील विषयांची तिन्ही निवेदने देण्यात आली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री सुशांत वसंत शिंदे, प्रमोद दिगंबर मेहेंदळे, हिंदु जनजागृती समितीचे रवींद्र कोळेकर, दिनेश कडव, सुभाष दाभोळकर आणि अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या.

चिंचवड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘शिकारा’ चित्रपटाच्या निषेधार्थ आंदोलन करणारे आंदोलनकर्ते

चिंचवड येथे १३ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात या मागण्या करण्यात आल्या. या वेळी ५० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. आंदोलनस्थळी स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आंदोलनाचा विषय पाहून रस्त्याने जाणार्‍या १ महिला शेवटपर्यंत आंदोलनात सहभागी झाल्या. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद धर्माधिकारी यांनी ‘शिकारा’ चित्रपटामध्ये इतिहासाचे कशाप्रकारे मवाळीकरण आणि विकृतीकरण करण्यात आले आहे, हे सोदाहरण सांगितले.

चेन्नई येथे सीएए आणि एन्.आर्.सी. यांच्या समर्थनार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ, समवेत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् (१)

चेन्नई (तमिळनाडू) : येथे १६ फेब्रुवारीला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांच्या समर्थनार्थ ‘भारत हिंदु मुन्नानी’ या हिंदु संघटनेचे प्रमुख श्री. आर्.डी. प्रभु यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यात हिंदु मक्कल मुन्नानी, हिंदु सत्य सेना, अखिल भारतीय हिंदु महासभा, हनुमान सेना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचीही या आंदोलनाला वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी काही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांची या कायद्याविषयी भूमिका जाणून घेतली.

धार्मिक द्वेष निर्माण होण्याच्या नावाखाली ऐन वेळी आंदोलनाला अनुमती नाकारणारे पोलीस !

देहलीतील शाहीन बागमध्ये गेले ६५ हून अधिक दिवस विनाअनुमती धर्मांधांकडून आंदोलन चालू आहे. तेथे भारतविरोधी घोषणा दिल्या जात आहेत, बंदुका दाखवल्या जात आहेत, आंदोलनामुळे जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. याविषयी पोलीस कोणतीही कृती करत नाहीत, हे आश्‍चर्यजनकच होय !

पोलिसांनी आंदोलनाला पूर्वी दिलेली अनुमती धार्मिक द्वेष निर्माण होण्याची भीती असल्याचे सांगत ऐनवेळी नाकारली. ज्या जागेमध्ये हे आंदोलन होणार होते, ती जागा मुसलमानाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. भारत हिंदु मुन्नानीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी चर्चा केल्यानंतर अगदी थोड्या कालावधीसाठी आणि थोड्याशा जागेतच आंदोलन करण्याची अनुमती पोलिसांकडून देण्यात आली.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे यांचे गृहराज्यमंत्र्यांकडे निवेदन

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांनी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना १५ फेब्रुवारी या दिवशी निवेदन दिले. श्री. देसाई यांनी तात्काळ ‘पोलीस महानिरीक्षकांशी चर्चा करून यावर निर्णय घेऊ’, असे आश्‍वासन श्री. भोकरे यांना दिले.

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई (डावीकडे) यांना निवेदन देतांना संभाजीराव भोकरे (उजवीकडे)

गृहराज्यमंत्र्यांशी चर्चा करतांना श्री. भोकरे म्हणाले, ‘‘या चित्रपटाविषयी काश्मिरी हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवसेना कार्यकर्ते यांच्या भावना तीव्र आहेत. या चित्रपटामुळे सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो. तरी या चित्रपटाचे प्रमाणपत्र रहित करून चित्रपटावर कायमची बंदी घालावी.’’ या वेळी सर्वश्री जी.आर्. काशीद, भरमा शिंदे, नारायण कुंभार, नेताजी भोकरे यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

जालना येथे ‘शिकारा’ चित्रपटाच्या विरोधात प्रशासनाला निवेदन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराची दिशाभूल करणार्‍या ‘शिकारा’ चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रहित करण्याच्या मागणीसाठी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार श्री. संतोष बनकर यांना निवेदन देण्यात आले.

नायब तहसीलदार श्री. संतोष बनकर यांना निवेदन देतांना धर्माभिमानी

या वेळी वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. रमेश महाराज वाघ, ह.भ.प. कारभारी महाराज अंभोरे, श्री. अमित दुसाने, श्री. आनंद वाघमारे, पेशवा संघटनेचे श्री. अमित कुलकर्णी, श्री. दीपक मारोळकर, श्री. बालाजी नलमेल, कु. प्रियांका लोणे यांसह ३० हून अधिक कार्यकर्ते सहभागी होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *