Menu Close

महाराष्ट्र-गुजरात आणि बेळगाव येथे विविध ठिकाणी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंचा हिंदुत्वाचा शंखनाद !

जालना येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला १२ सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती !

धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – टी. राजासिंह, आमदार

जालना येथील सभेच्या व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला वंदन करतांना आमदार श्री. टी. राजासिंह आणि समवेत सद्गुरु नंदकुमार जाधव आणि कु. रागेश्री देशपांडे

जालना : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी मुसलमानांच्या विरोधात नाही. याविषयी चालू असलेला आकांडतांडव निरर्थक आहे. जातीजातींत विखुरल्यामुळे हिंदु धर्म संकटात आला आहे. धर्मरक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी सर्व हिंदूंनी केवळ हिंदू म्हणूनच संघटित व्हावे, असे आवाहन गोरक्षक आणि भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांनी येथे केले. येथील आझाद पटांगणात ९ फेब्रुवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत एकवटलेले सहस्रो जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ‘शाहीन बागमध्ये बुरखाधारी महिला सीएएच्या विरोधात २ मासांपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी बुरखाबंदी, तिहेरी तलाक, महिलांवर होणारे अत्याचार यांसाठी लढण्याची आवश्यकता आहे.’, असेही ते म्हणाले.

या वेळी व्यासपिठावर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या. येथील ग्रामदेवता श्री मम्मादेवी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपाशीर्वादाने सभा चैतन्यदायी वातावरणात पार पडली. शहरातील जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक यांनी साहाय्य केल्यानेे सभेला १२ सहस्रांहून अधिक उपस्थिती लाभली.

सभेत समितीचे श्री. अमोल वानखेडे यांनी शंखनाद केला, तर श्री. प्रशांत जुवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

सध्या प्रतिदिन १४ मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. धर्माचरण, धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्‍चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची लाज वाटते. घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे मुलींना वाटते. ‘लव्ह जिहाद’चे संकट तर आता दारापर्यंत येऊन पोचले आहे. हे सर्व रोखण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. यासाठी समितीच्या वतीने विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणही दिले जाते. सर्व हिंदु भगिनींनी यात सहभागी होऊन त्यांचा लाभ घ्यावा !

हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंनी साधना करावी ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी हिंदूंनी साधना करावी. हिंदु संस्कृतीचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करून श्रद्धेने धर्माचरण करा. ‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीमुळे आपण शिक्षित होत आहोत; पण धर्मापासून दूर जात आहोत. धर्माचरण करणे न्यूनतेचे वाटत आहे; पण संस्कृती सोडल्याचा परिणाम आज प्रत्येक घरात दिसत आहे. आज अनेकांना टिळा लावायला लाज वाटते; पण टिळा हा इतरांना दाखवण्यासाठी नाही, तर ‘यातून मला आध्यात्मिक लाभ मिळणार आहे’, यासाठी टिळा लावा. मंदिरांत होणार्‍या सर्वप्रकारच्या अपप्रकारांविषयी आवाज उठवला पाहिजे आणि सरकारवर हिंदु समाजाचा दबाव निर्माण करून मंदिरे भक्तांच्या हाती देण्यास बाध्य केले पाहिजे. हिंदु समाज जर मंदिर रक्षणासाठी खंबीरपणे उभा राहिला, तर मंदिरांची सरकारीकरणातून निश्‍चितच मुक्तता होऊ शकते.

सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘हिंदूंनी प्रतिदिन टिळा लावून धर्माचरण करावे’, असे आवाहन करून ‘किती जण प्रतिदिन टिळा लावणार ?’, असे विचारले असता सर्वांनी हात वर करून ‘प्रतिदिन आम्ही टिळा लावू’, असे सांगितले.

देशहित, राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांना विरोध करणार्‍यांची स्थिती आज ‘अंधे घोडे मैदान में दौडे’ अशा प्रकारची झालेली आहे. देशहिताचे निर्णय घेतांना त्याला विरोध का केला जातो ? आपल्याला देशहित, राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. ‘हस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान’ अब यह नही चलेगा । ये नया हिंदुस्तान है । बताना पडेगा की, घुस के लेंगे पाकिस्तान और बना देंगे अखंड हिंदुस्तान ।’ हिंदूंनी आता जागृत होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करणे आवश्यक आहे; कारण ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झालेले आहेत.

पोलिसांकडून प्रथमोपचार कक्ष आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा

सभेतील प्रथमोपचार कक्षाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी प्रथमोपचाराचा संपूर्ण विषय समजावून घेतला. ते म्हणाले, ‘‘प्रथमोपचाराचे कार्य आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. प्रथमोपचाराचे शिक्षण सर्वांनी घ्यायला हवे.’’

हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती पाहून हिंदु राष्ट्राची स्थापना निश्‍चित होण्याचा विश्‍वास आमदार टी. राजासिंह ठाकूर यांच्याकडून व्यक्त !

आमदार टी. राजासिंह ठाकूर बोलण्यास उभे राहिल्यावर सर्व हिंदुत्वनिष्ठांनी घोषणा देण्यास प्रारंभ केला. ‘जालना येथील हिंदुत्वनिष्ठांची मोठी उपस्थिती पाहून हिंदु राष्ट्राची स्थापना निश्‍चितच होईल’, असा विश्‍वास आमदार टी. राजासिंह यांनी व्यक्त केला. या वेळी सर्वांनी मोठ्या आवाजात ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा दिल्याने पटांगणाचा परिसर दणाणून गेला.

आमदार टी. राजसिंह यांनी सिद्ध केलेल्या गीताचे लोकार्पण !

आमदार टी. राजसिंह यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वतःच्या आवाजात सिद्ध केलेल्या गीताचे लोकार्पण सभेत करण्यात आले.


सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत १० सहस्र हिंदूंचा हिंदुत्वाचा शंखनाद !

सोलापूर शहरात एकही होर्डिंग लावलेले नसतांना आणि सभेसाठी केवळ हिंदु जनजागृती समितीचेच वक्ते असतांना सभेसाठी १० सहस्र हिंदूंची उपस्थिती लाभणे, हे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यावरील विश्‍वास वाढत असल्याचे द्योतक आहे !

सोलापूर : सध्या धर्मांधांकडून ‘हलाल इकॉनॉमी’ पुढे आणण्यात येत असून धर्मांधांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जात आहे. ‘हलाल’द्वारे धार्मिक आधारावर पैसा उभा करून समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. ‘हलाल इकॉनॉमी’ म्हणजे राष्ट्र आणि धर्म विरोधी कृत्यांसाठी अर्थपुरवठ्याचे षड्यंत्र आहे. तरी जागृत हिंदूंनी हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन ‘लष्कर-ए-हिंद’ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल १२ फेब्रुवारी या दिवशी येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानात आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत बोलत होते. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये, तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनीही मार्गदर्शन केले.

या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह शहर, तसेच आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू असे १० सहस्र धर्मप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल म्हणाले,

(भाषणाच्या प्रारंभी श्री. खंडेलवाल यांनी सिद्धेश्‍वर देवाला नमस्कार करून ‘स्वातंत्र्यपूर्वकाळात देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतीकारकांना मी नमन करतो’, असे सांगितले.)

१. ‘लव्ह जिहाद’चा धोका मोठ्या प्रमाणात हिंदु समाजासमोर असून सोलापुरातही धर्मांधांकडून हिंदु तरुणींना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे.

२. सोलापुरात रहित झालेल्या पशूवधगृहाला परत अनुमती देण्यात आली. केवळ अल्पसंख्यांकांची मतपेढी सांभाळण्यासाठी असे प्रकार होत असून हिंदूंनी आता गोरक्षणासाठी त्यांचीही संघटनशक्ती दाखवून देण्याची वेळ आली आहे. हे पशूवधगृह बंद करण्यासाठी होणार्‍या आंदोलनात मी तुमच्या समवेत असेन.

३. केंद्र सरकाराने संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ देहली येथील शाहीन बाग येथे आंदोलन चालू आहे. अशाच प्रकारे सोलापुरातही शाहीन बागेसारखे आंदोलन करण्यात आले. धर्मांधांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून यात बांगलादेशी घुसखोरही मोठ्या प्रमाणात आहेत. सोलापुरातही असे घुसखोर आहेत. याविषयी नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे.

४. सोलापूर ही शूरवीरांची भूमी आहे, ही शौर्यभूमी आहे. येथील लोकांचे धर्माप्रती असलेले प्रेम पाहून प्रकृती अस्वास्थ्य असूनही मी येथे येण्यापासून स्वत:ला थांबवू शकलो नाही.

‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाची चर्चा होणे ही हिंदु राष्ट्र-जागृती सभांची सर्वांत मोठी फलनिष्पत्ती ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

अनेक वर्षांपासून देशाचे राष्ट्रीय स्वप्न असलेले ३७० कलम हटवले गेले आहे. पाकव्याप्त काश्मीर परत मिळण्याची आस भारतियांना लागली आहे. श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. संसदेत प्रत्येक निर्णयाच्या विरुद्ध आक्षेप घेतांना विरोधी पक्ष ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्दप्रयोग करत आहेत. १० वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला कडाडून विरोध होता; पण हिंदु राष्ट्र-जागृती सभांनी लक्षावधी लोकांमध्ये जागृती केली, असे नाही, तर संसदेमध्ये बसलेल्या राज्यकर्त्यांच्या मनातही जागृती केली आहे. ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाची राष्ट्रीय स्तरावर होणारी चर्चा म्हणजे हिंदु राष्ट्र-जागृती सभांची सर्वांत मोठी फलनिष्पत्ती आहे !

भाषणांतील सूत्रांना उपस्थितांचा प्रतिसाद . . .

१. पाकिस्तानी-बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांविषयी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये बोलत असतांना त्यांनी इतक्या पोटतिडकीने विषय मांडला की, धर्मबांधवांवरील अत्याचार ऐकून धर्मप्रेमी हेलावले.

२. अनेक सूत्रांना धर्मप्रेमींनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला, तसेच त्यांच्या अनेक वाक्यांना धर्मप्रेमींनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.

३. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून हिंदूंचे कृतीशील संघटन उभे राहत आहे’, असे सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितल्यावर उपस्थितांनी हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला.

सभेच्या माध्यमातून हिंदूंचे प्रभावी संघटन होणे ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने होणारी वाटचाल ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध आणि हिंसाचारामागे षड्यंत्र असून त्यासाठी १२० कोटी रुपये व्यय झाल्याचे अनेक अन्वेषण यंत्रणांच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. उत्तरप्रदेश येथे झालेल्या हिंसाचारामागे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. धर्मांध संघटनांकडून ‘भारत तेरे तुकडे होंगे’सारख्या देशविरोधी घोषणा देण्यात येत आहेत.

या सभेला असणार्‍या धर्मप्रेमींची उपस्थिती कोणाला समर्थन देण्यासाठी अथवा विरोध करणार्‍यांसाठी नसून तर सभेच्या माध्यमातून हिंदूंचे प्रभावी संघटन उभे राहात आहे. यातूनच हिंदु राष्ट्राच्या स्थापनाच्या दिशेने वाटचाल होणार आहे.

…आणि जयभवानी प्रशालेचे मैदान भ्रमणभाषच्या दिव्यांनी उजळले !

‘हिंदूंचे नववर्ष गुढीपाडवा असून गुढीपाडव्यालाच प्रत्येकाने शुभेच्छा द्यायच्या आहेत, तसेच आजपासून धर्माचरण करण्याचा निर्धार करायचा आहे. हे करण्यासाठी जे जे सिद्ध आहेत त्यांनी भ्रमषभाषची विजेरी लावा’, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केल्यावर धर्मप्रेमींनी भ्रमणभाषची विजेरी चालू करून हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला. यामुळे जयभवानी प्रशालेचे पटांगण भ्रमणभाषच्या दिव्यांनी उजळून निघाले. यात विशेष म्हणजे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांनीही त्यांच्या भ्रमणभाषची विजेरी चालू करून त्यात सहभाग नोंदवला.


शिरगाव (सिंधुदुर्ग) येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेला ५ सहस्र ५०० धर्माभिमान्यांची उपस्थिती

डावीकडून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, अधिवक्त्या (सौ.) कावेरी राणे, श्री. मनोज खाडये आणि दीपप्रज्वलन करतांना सद्गुरु सत्यवान कदम

देवगड – काही काळापूर्वी ‘हिंदु’ हा शब्द उच्चारण्याची भीती हिंदु धर्मियांना वाटत होती; मात्र आता काळ पालटत असून हिंदूंना सकारात्मक असे अनेक निर्णय घेतले जात आहेत. हिंदु राष्ट्र-जागृती सभांनी केवळ काही लाख लोकांमध्ये जागृती केली असे नव्हे, तर राज्यकर्त्यांच्या मनातदेखील जागृती केली आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा एवढा दबदबा निर्माण झाला आहे की, विरोधकही विरोध करतांना हिंदु राष्ट्र संकल्पनेचाच उद्घोष करतांना दिसतात. हिंदु राष्ट्र ही संकल्पना सर्वांच्या मनात रुजत असून तो दिवस लवकरच येईल, असे आश्‍वस्त मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी येथे केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तालुक्यातील शिरगाव येथील शिरगाव हायस्कूलच्या पटांगणात रविवार, ९ फेब्रुवारी या दिवशी जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये मार्गदर्शन करत होत्या. सभेच्या प्रारंभी समितीचे श्री. राजेंद्र परब यांनी शंखनाद केला. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

शिरगाव (देवगड) येथील हिदु राष्ट्र-जागृती सभेतील वक्त्यांची तेजस्वी भाषणे आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

१. प.पू. घडशी महाराज २. सद्गुरु सत्यवान कदम आणि सभेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

धर्मप्रेमींचा सत्कार

१. सभा यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे शिरगाव येथील ‘लोके भवन’चे मालक धर्मप्रेमी श्री. सहदेव लोके यांचा सत्कार सद्गुरु कु. स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन करण्यात आला, तसेच कोळोशी येथील धर्मप्रेमी श्री. संजय आप्पा इंदप यांचा सत्कार सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते करण्यात आला.

२. शिरगांव येथील श्री. मंगेश लोके आणि पंचायत समितीचे माजी सभापती श्री. रविंद्र जोगल, शिरगांव येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्री. संतोष फाटक यांचा सत्कार सनातनचे श्री. भास्कर खाडिलकर यांनी केला.

‘लोके भवन’चे मालक श्री. सहदेव लोके (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

बेळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत कडाडले हिंदुतेज !

डावीकडून श्री. कार्तिक साळुंखे, दीपप्रज्वलन करतांना अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. आणि श्री. सुमित सागवेकर

बेळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ फेब्रुवारी या दिवशी धर्मवीर संभाजी महाराज उद्यान, महाद्वार रोड येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेत हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर आणि सनातन संस्थेचे श्री. कार्तिक साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध राजकीय पक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मरोली (गुजरात) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सभेला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

मरोली, उंबरगाव – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), तीन तलाक कायदा करणे, तसेच ३७० कलम रहित करणे हे केंद्रशासनाच्या दृढ मनोबळामुळेच शक्य झाले आहे. हिंदु जनजागृती समितीही असेच देशहिताचे कार्य करत आहे, याचा मला आनंद वाटतो, असे गौरवोद्गार गुजरात राज्य वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री श्री. रमणभाई पाटकर यांनी काढले. येथील श्री राधाकृष्ण मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेत राज्यमंत्री श्री. पाटकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील आणि सनातन संस्थेच्या सौ. अंशु संत या उपस्थित होत्या.

रमणभाई पाटकर, वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री, गुजरात

सभेचा आरंभ शंखनाद, वेदपठण आणि दीपप्रज्वलन यांनी झाला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. निखिल दरजी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय करून दिला. श्री. विजय पाटील यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि राष्ट्ररक्षण कसे करायचे ?’ या विषयांवर मार्गदर्शन केले, तर सनातन संस्थेच्या साधिका सौ. अंशु संत यांनी साधनेचे महत्त्व विषद करून सर्वांनी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी कृतीशील होण्याचे आवाहन केले.

मरोली गावचे निवासी असलेले आणि सध्या बडोदा येथे राहणारे श्री. नारायण दत्त श्रीमाळी यांचे शिष्य अन् बगलामुखीचे उपासक श्री. प्रवीण जोशी यांनी ‘हा देश हिंदूंचा आहे, हेच त्यांना विसरायला लावण्याचे षड्यंत्र आहे; पण हिंदु जनजागृती समितीच्या कार्यामुळे हिंदूंमध्ये जागृती होईल’, असा विश्‍वास व्यक्त केला. सभेनंतरच्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी क्रियाशील होण्याची सिद्धता दर्शविली. सभेचे सूत्रसंचालन सौ. उज्ज्वला पंचाल यांनी केले.

हेर्ले (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

सभेला उपस्थित धर्मप्रेमी

हेरले : मंदिर, गोमाता और देवी-देवताएं हिन्दुओं के आस्था के केंद्र हैं । आज विविध माध्यमों द्वारा बडी मात्रा में उनका अनादर किया जा रहा है । इसे रोकने हेतु हिन्दुओं में धर्मजागृति लाना आवश्यक है । हिन्दू जनजागृति समिति के कोल्हापुर जनपद समन्वयक श्री. किरण दुसे ने ऐसा प्रतिपादित किया । १० फरवरी को यहां के श्री हनुमान मंदिर में आयोजित हिन्दू राष्ट्र-जागृति सभा में वे ऐसा बोल रह थे । इस अवसरपर सनातन संस्था की ओर से आधुनिक वैद्या (श्रीमती) शिल्पा कोठावळे ने भी उपस्थि धर्मप्रेमियों का मार्गदर्शन किया ।

इस सभा को सफल बनाने हेतु श्री. विजय कारंडे एवं श्री. प्रदीप मोहिते का सहयोग मिला । सभा के प्रसार हेतु धर्मप्रेमी श्री. प्रकाश संकपाळ, श्रीमती गौरी पोतदार, श्रीमती अश्‍विनी काशीद, श्रीमती अपर्णा भोसले आदि ने सहयोग दिया । धर्मप्रेमी श्रीमती अनुराधा शिंदे ने धर्मशिक्षावर्ग की मांग की ।


अमरावती येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात पार पडली

दीपप्रज्वलनानंतर नमस्कार करतांना डावीकडून श्री. श्रीकांत पिसोळकर, पू. अशोक पात्रीकर आणि सौ. अनुभूती टवलारे

अमरावती : आज धर्माचरणाच्या अभावामुळे हिंदु संस्कृतीची हानी होत आहे. हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रतिदिन सर्वांनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले. ते येथील आझाद हिंद मंडळाच्या मैदानावर ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये बोलत होते. सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून झाला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय अमरावती जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी करून दिला. त्यानंतर स्वरक्षणाची प्रात्याक्षिके दाखवण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता जामोदे यांनी केले.


हडपसर (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

पुणे : हडपसर (पुणे) येथील मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानात हिंदुत्वनिष्ठांमध्ये जाज्वल्य धर्माभिमान जागवणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा १६ फेब्रुवारीला पार पडली.

दीपप्रज्वलन, शंखनाद आणि वेदमंत्रपठण यांमुळेे सभास्थळी चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर झालेल्या वक्त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित धर्मप्रेमींमधील राष्ट्र-धर्म कार्य करण्याची प्रेरणा जागृत झाली. सभेत आलेल्या सहस्रो हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *