हे छायाचित्रे छापण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणे, हा उद्देश नसून या आस्थापनांनी केलेले विडंबन समाजाला कळावे, हा उद्देश आहे. – हिंदुजागृती
मुंबई – युसी ब्राऊजर या आस्थापनाने दिवाळी या हिंदूंच्या सणाच्या पार्श्वभूमीवर एक विज्ञापन प्रसारित केले आहे. आपल्याला माहित आहे का की, दिवाळीच्या रक्षणासाठी राम युसी ब्राऊजरचे साहाय्य घेतो ? या नावाने प्रसारित करण्यात येणार्या या विज्ञापनातून हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम यांचे घोर विडंबन केले आहे. सामाजिक संकेतस्थळांवरून जागृत आणि धर्माभिमानी हिंदू आस्थापनाच्या या हिंदुविरोधी कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहेत, तसेच सहस्रो हिंदूंनी या आस्थापनाचे अॅप वापरणे सोडून दिले आहे. आस्थापनाने प्रसारित केलेल्या विज्ञापनात रामायणाचा आणि रामाचा अनादर करण्यात आला आहे. या विज्ञापनात दाखवल्यानुसार एक सामान्य युवक युसी ब्राऊजरच्या साहाय्याने रामायण काळात पोहोचतो. तेथे तो रावणाशी युद्ध करणारे प्रभु श्रीराम आणि हनुमान यांच्याशी अत्यंत अभद्र भाषेत संभाषण करतो. या विज्ञापनात प्रभु श्रीराम आणि हनुमान यांनाही संभाषणाच्या वेळी अभद्र भाषेचा वापर करतांना दाखवले आहे.
युसी ब्राऊजर आस्थापनाच्या फेसबूक पानावर अनेक हिंदूंनी, तसेच अन्य धर्मीयांनीही आस्थापनाच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यातील काही प्रतिक्रिया येथे देत आहोत
१. श्री. अनिल गर्ग – हे विज्ञापन पाहून मी या आस्थापनाचे अॅप वापरणे बंद केले आहे. हे विज्ञापन म्हणजे हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे घोर विडंबन आहे. मी माझ्या हिंदु बांधवांना आवाहन करतो की, त्यांनीही या आस्थापनाचे अॅप वापरणे सोडून द्यावे.
२. झुहैब खान – कोणत्याही धर्मग्रंथांचे असे विडंबन करणे अयोग्य आहे. अतिशय चुकीचे आहे. मी युसी ब्राऊजर वापरणे सोडून दिले आहे.
३. श्री. अपूर्व बिश्नोई – अशा प्रकारचे विडंबनात्मक विज्ञापन ही या आस्थापनाची भारतातून नामशेष होण्याची नांदी आहे. सहस्रो हिंदूंनी या विज्ञापनानंतर हे अॅप काढून टाकले आहे.
धर्माभिमानी हिंदु पुढील संपर्क पत्त्यावर त्यांचा निषेध नोंदवत आहेत.
कार्यालयाचा पत्ता : टाइम टॉवर, युनिट क्रमांक ८०२, ८ वा माला, सेक्टर २८, एम.जी. रोड, गुडगांव – १२२००२ (हरियाणा), भारत.
दूरभाष क्रमांक : (०१२४) ४०२ ७४१८ संगणकीय पत्राचा पता : [email protected]