- गुटरेस यांनी भारतातच गेल्या ३ दशकांपासून धर्मांधांच्या अत्याचारांमुळे विस्थापित झालेल्या हिंदूंविषयी कधी विधान केले आहे का ? पाकमध्ये जाऊन सातत्याने पाकची तळी उचलणारे गुटरेस यांना भारताने कडक आणि समजेल अशा शब्दांत सुनावणे आवश्यक आहे !
- भारतात घुसखोरी केलेल्यांना देशात थारा न देण्याचा भारताला अधिकार आहे. जर संयुक्त राष्ट्रांना या घुसखोरांची काळजी वाटत असेल, तर त्यांनी त्यांना घेऊन जावे !
नवी देहली : भारतीय संसदेने संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे २० लाख लोक निर्वासित होण्याचे संकट निर्माण झाले आहे. यांत बहुसंख्येने मुसलमान आहेत, याची मला चिंता वाटते, असे विधान पाकच्या दौर्यावर असलेले संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस यांनी केले. गुटरेस पुढे म्हणाले, ‘‘एखाद्या देशाने नागरिकतेशी संबंधित कायद्यामध्ये पालट केला, तरी त्या देशातील लोक निर्वासित होण्याची स्थिती निर्माण होता कामा नये.’’ (म्हणजे भारताने घुसखोरांना आयुष्यभर पोसायचे का ? असाच फुकाचा सल्ला गुटरेस अमेरिकेला देण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ? – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात