भारतात कधीतरी अशी शिफारस कुणी करील का ?
कोलंबो (श्रीलंका) : श्रीलंकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संसदीय समितीने देशात तात्काळ बुरखाबंदी करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय धर्म आणि जाती यांच्या आधारावर चालणार्या राजकीय पक्षांची नोंदणी रहित करण्यासही सांगितले आहे. समितीने या शिफारसी गेल्या वर्षी ‘इस्टर संडे’च्या वेळी शहरात झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केल्या आहेत. या आक्रमणात २५० हून अधिक जण ठार झाले होते.
१. या समितीने सल्ला दिला आहे की, पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी कोणाचाही तोंडवळा पहाण्याचा अधिकार असला पाहिजे. जर पोलिसांची विनंती ती व्यक्ती मान्य करत नसेल, तर तिला विना वॉरंट अटक केली पाहिजे.
२. मदरशांमध्ये शिकणार्या सर्व विद्यार्थ्यांना ३ वर्षांच्या आत शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सामान्य शाळांमध्ये भरती करून घ्यावे. मदरसे धार्मिक आणि सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत चालवण्यासाठी एक समिती स्थापन केली पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात