Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांना मार्गदर्शन

पू. नीलेश सिंगबाळ यांचा बंगाल दौरा

पू. नीलेश सिंगबाळ

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी नुकताच बंगाल दौरा केला. या वेळी त्यांनी राज्यातील विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ यांची भेट घेऊन त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली, तसेच बर्‍याच ठिकाणी त्यांनी मार्गदर्शनही केले. याविषयीचा सविस्तर वृत्तांत येथे देत आहे.

हुगळी (बंगाल) हिंदु राष्ट्र-धर्म जागृती सभेमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून मार्गदर्शन

हुगळी (बंगाल) : येथील आरामबागमध्ये ‘महाभारत संघा’कडून हिंदु राष्ट्र-धर्म जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. शंभू गवारे यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची मूलभूत संकल्पना’, तर ‘जीवनामध्ये साधनेचे महत्त्व आणि प्रत्यक्ष साधना कशी करावी’ याविषयावर हिंदु जनजागृती समितीचे पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदशन करतांना केले. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. सुमंतो देबनाथ यांनी केले. या सभेचे आयोजन अधिवक्ता बिम्लेंद्रू मुखोपाध्याय यांनी केले होते.

स्वभावदोष दूर केल्याने आपण तणावमुक्त आणि आनंदी जीवनाची अनुभूती घेऊ शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

कोलकाता (बंगाल) : येथील शास्त्र धर्म प्रचार सभेच्या सेवकांसाठी एक दिवसाच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची मूलभूत संकल्पना’, ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ आणि ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामधील उपक्रमांचे आयोजन कसे करावे ?’, या विषयांवर हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे आणि समन्वयक श्री. सुमंता देबनाथ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘स्वभावदोष दूर केल्याने आपण तणावमुक्त आणि आनंदी जीवनाची अनुभूती घेऊ शकतो’, असे पू. सिंगबाळ यांनी सांगितले. या कार्यशाळेला शास्त्र धर्म प्रचार सभेचे पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांची वंदनीय उपस्थिती होती. याचे आयोजन शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिकचंद्र मल्लिक आणि श्री. सोबन सेनगुप्ता यांनी केले.

हिंदु जनजागृती समितीचे कार्य आशेचा किरण ! – स्वामी मृगानंद, श्री सत्यानंद देवयातन आश्रम, बंगाल

जाधवपूर (बंगाल) : आज भारतातील हिंदू प्रतिकूल स्थितीत जगत आहेत आणि जर आताच काही केले नाही, तर आपण नष्ट होऊ. आमच्या गुरुदेवांनी आम्हा सर्वांवर स्वरक्षणासाठी शारीरिक क्षमतेसहित आध्यात्मिक बळ वाढण्याच्या आवश्यकतेचे संस्कार केले आहेत. त्यांनी मोगलांच्या विरोधात युद्ध करण्याची सिद्धता केली होती. तशीच आम्ही वर्तमानात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन ‘श्री सत्यानंद देवयातन आश्रम’ येथील स्वामी मृगानंद यांनी केले. ते त्यांच्या भक्तांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ आणि समितीचे समन्वयक श्री. शंभू गवारे उपस्थित होते. स्वामी मृगानंद यांनी या वेळी समितीचे कार्य जाणून घेतल्यावर ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य आशेचा किरण आहे’, असे म्हटले.

येथील श्री सत्यानंद देवयातनमध्ये संस्थापक ठाकुर सत्यानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पू. सिंगबाळ आणि श्री. शंभू गवारे यांनी ठाकुर सत्यानंद यांच्या शिष्या अर्चना माँ आणि त्यांचे शिष्य स्वामी मृगानंद यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आशीर्वचन घेतले आणि त्यांना गोव्यात आयोजित करण्यात येणार्‍या नवमं अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण दिले. या वेळी देवयातनचे स्वामी आत्मस्वरूपानंद हेही उपस्थित होते.

विविध हिंदुत्वनिष्ठांच्या गाठीभेटी

डावीकडून श्री. शंभू गवारे, अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी आणि पू. नीलेश सिंगबाळ

पू. नीलेश सिंगबाळ आणि श्री. शंभू गवारे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता जॉयदीप मुखर्जी, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. सागर बाग, तसेच ‘भारतीय साधक समाजा’चे श्री. सुमंतो मुखर्जी यांची भेट घेतली आणि त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *