Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भुसावळ (जळगाव) येथे शिवजयंतीनिमित्त व्याख्यान

जळगाव : शिवजयंतीला आपण शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपले आयुष्य जगलो, तर शिवरायांचे आदर्श हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र येण्यास फार वेळ लागणार नाही. घरोघरी जिजामाता निर्माण झाल्या की, छत्रपती शिवाजीही निर्माण होतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. त्या १९ फेब्रुवारीला शिवदत्तनगर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंतीनिमित्त व्याख्यानात बोलत होत्या. कार्यक्रमाची सांगता शिववंदना हिंदु संघटनेने शिववंदना घेऊन केली. या वेळी आमदार संजय सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, नगरसेवक मुकेश गुंजाळ हे मान्यवर उपस्थित होते.

भुसावळ येथील नगरपालिकेच्या शाळेत १३ फेब्रुवारीला शिववंदना संघटना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने माता-भगिनींसाठी धर्मसत्संग, तसेच लव्ह जिहाद या संकटाविषयी जागृती करण्यासाठी प्रवचन आयोजित केले होते. त्यात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी मार्गदर्शन केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *