- देशविरोधी कृती करणार्या भारतद्वेष्ट्यांच्या विरोधात वैध मार्गाने आंदोलन करणार्या धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी संघटनांच्या आंदोलनांमध्ये अशा प्रकारे पाकप्रेमी घुसतात अन् घोषणा देतात, हे अतिशय गंभीर आहे. धर्मप्रेमी हिंदूंनो, अशा प्रकारांविषयी सतर्क रहा !
- आज अशा प्रकारे निदर्शनांच्या ठिकाणी घुसणारे हे भारतद्वेष्टे भविष्यात हिंदु संघटनांची निदर्शने उधळण्याचा किंवा राष्ट्रप्रेमींना दुखापत करण्याचाही प्रयत्न करू शकतात. हे लक्षात घेऊन पोलिसांनी या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे एम्.आय.एम्.च्या सभेमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या अमूल्या लियोना हिच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीद्वारे २० फेब्रुवारी या दिवशी येथील टाऊन हॉल जवळ निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने संपत आली असतांना निदर्शनांच्या मागील बाजूला अरुद्रा नावाच्या तरुणीने ‘फ्री काश्मीर’ असा फलक धरून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा दिली. या वेळी कार्यकर्त्यांनी तत्परतेने तिला विरोध केला आणि येथे उपस्थित पोलिसांनी लगेच तिला अटक केली. त्यानं तर समितीच्या वतीने एस्.जी. पार्क पोलीस ठाण्यात अरुद्रा हिच्या विरोधात देशविरोधी घोषणा देऊन द्वेष उत्पन्न करणारे कृत्य केल्याविषयी तक्रार करण्यात आली. तसेच या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांच्या वेळी समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, श्रीराम सेनेचे बेंगळुरूचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर, तसेच हिंदू महासभा, कन्नड संघटन यांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वारिस पठाण यांना तात्काळ अटक करा ! – मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती
अमूल्या हिला तत्परतेने हद्दपार केले पाहिजे. ‘तिच्या मागे कोण आहेत ?’, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच ‘१०० कोटींना १५ कोटी पुरून उरतील’, असे चिथावणीखोर विधान करणारे एम्.आय.एम्.चे माजी आमदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांना तात्काळ अटक करावी. पठाण यांनी पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या समोर हे विधान केले. तसेच अमूल्यानेही त्यांच्या उपस्थितीत देशद्रोही विधान केले. यामुळे त्यांना आणि सभेचे आयोजक इम्रान पाशा यांच्यासह मंचावर उपस्थित सर्वांना अटक करण्यात यावी, अशी मागणी समितीचे श्री. गौडा यांनी केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांनी तात्काळ ही कृती करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात