Menu Close

मालेगाव : धर्मांधांकडून शाळेची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक

प्रसारमाध्यमांनी वृत्त दडपले !

dharmandh1मालेगाव : ५ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून ८ एप्रिल या दिवशी संतप्त धर्मांधांनी मदर आयेशा प्राथमिक शाळेची तोडफोड करत जाळपोळ केली. आयेशानगर भागातील खातून एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आहे. धर्मांधांनी पोलिसांवरही दगडफेक करत ५ वाहने जाळली.

या घटनेमुळे शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. (दादरी हत्याकांड असो अथवा देहलीमधील चर्च आणि ख्रिस्ती शाळांवर झालेली आक्रमणे असोत, अशा बातम्यांना ऊठसूट प्रसिद्धी देऊन त्यांना धार्मिक रंग देणारी प्रसारमाध्यमे मालेगावची शाळा आणि तेथील पोलिसांवरील आक्रमणाच्या घटनेची साधी दखलही घेत नाहीत, हे लक्षात घ्या ! आक्रमण करणार्‍याची जात अथवा धर्म कोणता ? यांवरून प्रसिद्धीमाध्यमांच्या बातम्या बनत असतील, तर स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी प्रसिद्धीमाध्यमे ‘धर्मांध’च होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. मदर आयेशा शाळेत शिक्षण घेत असलेल्या ५ वर्षीय बालिकेचा शाळेतील सफाई कामगार अजय दणके याने अश्‍लील वर्तन करून विनयभंग केला, असा आरोप करण्यात येत आहे.

२. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाने या कर्मचार्‍याला निलंबित करावे, अशी मागणी करत धर्मांधांनी शाळेतील साहित्याची तोडफोड आणि नासधूस केली.

३. धर्मांध अधिक वाढल्यानंतर काहींनी शाळेला आग लावल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

४. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्यासह अनेक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (आरोपीवर कारवाई करण्याबरोबरच कायदा हातात घेणार्‍या धर्मांधांवरही कारवाई होणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *