नवी देहली : हांसी (हरियाणा) येथील एस्.डी. महिला महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शक्ती समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात दंड युद्ध योगासन आणि व्यायाम यांचे प्रकार दाखवण्यात आले.
महाविद्यालयाचे अध्यक्ष पू. शुक्राईनाथ योगी हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे डॉ. अतुल गर्ग आणि प्रमुख वक्ते डॉ. सुरेंद्र पाल होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीकडून येथे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. याचा अनेकांनी लाभ घेत समितीच्या कार्याचे कौतुक केले. पू. शुक्राईनाथ योगी यांना ‘हिंदु राष्ट्र-आक्षेप आणि खंडण’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट देण्यात आला.