Menu Close

मुंबई आणि नवी मुंबई येथे शिवजयंतीनिमित्त सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रबोधन

मुंबई / नवी मुंबई : शिवजयंतीनिमित्त येथे अनेक ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांतील काही ठिकाणचा हा संक्षिप्त वृत्तांत.

समाजावरील आघात रोखण्यासाठी छत्रपतींप्रमाणे हिंदवी स्वराज्याची स्थापना आवश्यक ! – सौ. नयना भगत

मोगलाईत मंदिरे, महिला, गोमाता आणि हिंदु समाज यांच्यावर अनन्वित अत्याचार होत होते. हे सर्व थांबण्यासाठी मोगल साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न माता जिजाऊंनी पाहिले. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी बाल शिवबावर ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज वृद्धींगत होईल, असे संस्कार केले. पुढे छत्रपती शिवरायांनी मावळ्यांसह प्रयत्नांची पराकाष्ठा करून हिंदवी स्वराज्य निर्माण करून जनतेला अन्यायापासून मुक्त केले. आजच्या परिस्थितीतही  हिंदु धर्म, मंदिरे, महिला, गोमाता आणि हिंदु समाज यांवर आघात होत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना. ते सत्यात उतरवण्यासाठी आज प्रत्येक घराघरात माता जिजाऊ असायला हवी, असे प्रतिपादन सनातनच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले. चेंबूर येथील संत गाडगे महाराज सेवा सोसायटी येथे शिवजयंती उत्सवात सौ. नयना भगत बोलत होत्या. या वेळी वसाहतीतील लहान-थोर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिसाद

या वेळी उपस्थितांना ‘लव्ह जिहाद’ याविषयी अधिक जाणून घ्यायचे होते. ‘लव्ह जिहादविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा या’, असे उपस्थितांनी त्यांना या वेळी सांगितले.

माहीम येथील साईनाथ मित्र मंडळात मार्गदर्शन

येथे आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग, त्यांचे शौर्य आणि आध्यात्मिक संपदा इत्यादी सूत्रे सांगून त्यांचा हा अलौकिक वारसा जतन करण्यासाठी आपण काय करायला हवे, याविषयी त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माहीम येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला येण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी उपस्थितांना केले.

तळवली, घणसोली (नवी मुंबई) येथे मार्गदर्शन ऐकतांना बाळगोपाळ आणि युवक

घणसोली (नवी मुंबई) येथील छत्रपती शिव शंभु युवा प्रतिष्ठान येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

आपण शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, तर त्यांचे गुण आपण आत्मसात केले पाहिजेत. महाराजांनी गुरूंचे मार्गदर्शन घेऊन आणि कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक बळही प्राप्त केले. आपणही शौर्यजागरण आणि आध्यात्मिक बळासाठी कुलदेवतेची उपासना केली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी नवी मुंबईतील तळवली गाव, घणसोली येथील छत्रपती शिव शंभु युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवात केले. या वेळी बाळगोपाळांसह १०० जण उपस्थित होते.

सानपाडा येथे मार्गदर्शन ऐकतांना उपस्थित धर्मप्रेमी

सानपाडा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ येथे हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद मानकर यांचे मार्गदर्शन

सानपाडा येथील सेक्टर १० मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ येथे मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर यांनी शिवरायांच्या आयुष्यातील काही प्रसंग मांडले. त्या वेळी परिस्थिती काय होती ?, महाराजांनी ती परिस्थिती कशी हाताळली ?, मावळ्यांचे संघटन कसे केले ?, शत्रूच्या अफाट संख्येपुढे संख्येने अल्प मावळ्यांसह ते कसे लढले ?, त्यांनी स्वतः गुरूंचे आणि ईश्‍वराचे साहाय्य कसे घेतले ? इत्यादी सूत्रे त्यांनी या वेळी स्पष्ट केली. तसेच ‘आजच्या परिस्थितीत शिवरायांचा आदर्श ठेवून आपण काय करायला हवे ?’, ‘उत्सव आणि सण या वेळी केवळ मनोरंजनाचे नव्हे, तर शौर्यजागृती करणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन कसे केले पाहिजे ?’, यांविषयी त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले. मंडळाचे ५० कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *