ठाणे : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात एम्.आय.एम्.चे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भिवंडी शहरात २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. देशभरात या प्रश्नावरून उसळलेली परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी ऐनवेळी अनुमती नाकारल्याने सभा रहित करण्याची नामुष्की एम्.आय.एम्.चे भिवंडी शहर पदाधिकार्यांवर आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न उद्भवू नये यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. या प्रयत्नांना यश आले आहे, तर ही सभा होऊ देणार नसल्याचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी सांगितले होते.
असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेचे आयोजन शहराध्यक्ष खालिद शेख गुड्डू यांनी केले होते. त्यासाठी शहरातील परशराम टावरे क्रीडांगण येथे मागील दोन दिवसांपासून जय्यत सिद्धता चालू केली होती; परंतु पोलिसांनी सभेची अनुमती नाकारत सभा पुढे ढकलण्याचे आवाहन आयोजकांना केल्याने सभा रहित करण्यात आली आहे. (ओवैसी यांची पार्श्वभूमी पहाता त्यांची सभा पूर्णत: रहित करणेच योग्य ठरेल ! – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात