- ‘खोटे बोला; पण रेटून बोला’, अशा वृत्तीची जागतिक इस्लामी संघटना ! देहलीतील हिंसाचार धर्मांधांनी केला असून त्यात बहुसंख्य हिंदूंची प्रचंड हानी झाली आहे, त्यांच्या हत्या झाल्या आहेत. असे असतांना अशा प्रकारची विधाने करून धर्मांधांना पाठीशी घालणार्या संघटनेवर भारतात कोणतेही कार्य करण्यावर बंदी घातली पाहिजे !
- जगात कुठेही मुसलमानांच्या विरोधात काही झाल्याची अफवा जरी पसरली, तरी त्यांच्यासाठी धावून येणार्या मुसलमान संघटनेकडून भारतातील हिंदूंच्या संघटना काही बोध घेतील का ?
रियाध (सौदी अरेबिया) : भारतामध्ये मुसलमानांच्या विरोधातील नुकत्याच झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक जण ठार झाले आणि निरपराध लोक घायाळ झाले आहेत. ही धोक्याची घंटा आहे. नवी देहलीत झालेल्या हिंसेमध्ये मुसलमानांची संपत्ती आणि मशिदी यांच्या झालेल्या हानीची आम्ही निंदा करतो. (असे कुठेही समोर आले नसतांना असा जागतिक स्तरावर जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक) या घृणास्पद हिंसाचारातील पीडित परिवारांच्या समवेत आम्ही आहोत, असे ट्वीट मुसलमानांची जागतिक संघटना असणार्या ‘इस्लामी सहयोग संघटने’ने (‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामी कोऑपरेशन’ने) या हिंसाचाराविषयी भाष्य करतांना केले आहे.
हे ट्वीट करतांना #IndianMuslimsInDanger असा ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर ट्विटरवर घडवून आणलेली चर्चा) वापरण्यात आला आहे. तसेच ‘भारतीय प्रशासनाने मुसलमानांच्या विरोधात हिंसा भडकावणारे आणि कट रचणारे यांना शिक्षा करून संबंधितांना न्याय द्यावा’, अशी मागणीही केली आहे. ‘भारतीय प्रशासनाने मुसलमान नागरिक आणि देशातील इस्लामची पवित्र स्थळे यांचे रक्षण करावे’, असेही या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
ही संघटना सौदी अरेबियाच्या प्रभावाखाली काम करणारी आहे. यात पाकसमवेत जगातील ५७ मुसलमानबहुल देश सहभागी आहेत. या संघटनेने काश्मीरसमवेत अनेक सूत्रांवर पाकला समर्थन दिलेे आहे. यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भातही या संघटनेने म्हटले होते की, हा कायदा आणि रामजन्मभूमीवरील न्यायालयाचा निकाल यावरून आम्ही चिंतित आहोत.
इस्लामी संघटनेने दायित्वशून्य विधाने करू नयेत ! – भारताने फटकारले
या ट्वीटवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर दिले आहे. या मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले की, या संघटनेने केलेली विधाने तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी आहेत. प्रत्यक्षात स्थिती अत्यंत सामान्य आहे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्ही अशा संघटनांना आवाहन करतो की, त्यांनी अशा प्रकारची दायित्वशून्य विधाने करू नयेत. रवीश कुमार पुढे म्हणाले की, या संघटनेने यापूर्वीही अशी असंवेदनशील विधाने केली आहेत आणि भारताच्या अंतर्गत प्रकरणांत टिपण्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात