Menu Close

तासगाव येथे बुधवार, १३ एप्रिल या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !

tasgao_photo
पत्रकार परिषदेत डावीकडून सचिन पवार, अभिजित घुले, डॉ. मानसिंग शिंदे आणि सौ. वैशाली राजहंस

तासगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरण करण्यास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या हेतूने तासगाव येथे १३ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आले आहे. ही सभा तासगाव येथील चंपाबेन वाडीलालच्या ज्ञानमंदिराच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होईल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते ९ एप्रिल या दिवशी तासगाव येथील विष्णु मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस, बजरंग दलाचे सहसमन्वयक श्री. अभिजित घुले, श्रीशिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख आणि गोल्ला समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सचिन पवार उपस्थित होते.

डॉ. मानसिंग शिंदे पुढे म्हणाले, या सभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून शहर आणि ग्रामीण पातळीवर फलक लावण्यात येत असून रिक्शांवर भीत्तीपत्रके लावण्यात येत आहेत. तासगाव शहर आणि ग्रामीण परिसरात विविध ठिकाणी तरुण मंडळे, तसेच अन्य ठिकाणी बैठका चालू आहेत. या सभेच्या प्रचारासाठी १० एप्रिल या दिवशी दुपारी ४ वाजता सांगली नाका ते शहरातील विविध मार्गांवरून वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीसाठीही हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *