इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) : भारतीय अर्थव्यवस्था विस्कळीत करून या देशाचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र आपल्या सर्वांसमोर आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक हिंदूने जागृत होऊन त्यासाठी संघटित होऊन आपले योगदान द्यायला हवे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. गायत्री भवन येथेे उद्योजकांसाठी ‘हलाल सर्टिफिकेट’द्वारे भारतीय अर्थव्यवस्थेला धोका’ या विषयावर २७ फेब्रुवारी या दिवशी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी २२ उद्योजक उपस्थित होते.
या वेळी अनेक उद्योजकांनी ‘आम्हाला हा विषय ठाऊक नव्हता आणि आम्ही याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले.